• Download App
    आमने - सामने : लसीचा तुटवडा-केंद्राचा भेदभाव असा आव आणनार्या राज्य आरोग्यमंत्र्यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी धू धू धूतले ।Union Health Minister scolds state health minister for pretending to be vaccinated

    आमने – सामने : लसीचा तुटवडा-केंद्राचा भेदभाव असा आव आणनाऱ्या राज्य आरोग्यमंत्र्यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी धू धू धूतले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात ठाकरे सरकार पूर्ण अपयशी ठरले असून त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची टीका हर्षवर्धन यांनी केली आहे. Union Health Minister scolds state health minister for pretending to be vaccinated

    कोरोनावरील लसीच्या तुटवड्याचे महाराष्ट्र सरकारचे आरोप निव्वळ खोटे आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राची चालढकल सुरू आहे. ठाकरे सरकारच्या या उदासिन भूमिकेमुळे कोरोना विरोधातील लढाईत सुरु असलेल्या प्रयत्नांना धक्का बसत असून देशाची मान खाली गेल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला आहे.



    राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा आहे. तीन दिवसात लस मिळाली नाही तर लसीकरण बंद पडेल,” असं विधान राजेश टोपे यांनी केलं होतं. राज्यातील काही जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद करण्यात आलंय ,असंही ते म्हणाले.

    राज्यात काही केंद्रांवर लसीकरण थांबवण्यात आलंय. लस उपलब्ध नसल्याने लोक परत जात आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे, केंद्राकडून न मिळणारे लशींचे डोस. राज्याला दर आठवड्याला 40 लाख लशींची गरज आहे. लोकांना लसीकरण केंद्रातून परतावं लागणं, राज्यासाठी ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे” असा आरोप महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आला.

    यावरून हर्षवर्धन यांनी सविस्तर माहिती देत महाराष्ट्र सरकारचे वाभाडे काढले आहेत.
    आरोग्य कर्मचारी असो की फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण महाराष्ट्र सरकारची कामगिरी फार काही कौतुकास्पद राहिली नाही. महाराष्ट्र सरकार नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचे सोडून खंडणीच्या वसुलीत गुंतले आहे, हे अतिशय धक्कादायक आहे.

    महाराष्ट्रातील नेते चुकीची माहिती पसरवत असून लसीकरणाबाबत भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र सरकारने अशा परिस्थितीत गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा आपल्या राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर द्यावा अशा शब्दांत केंद्रिय आरोग्यमंत्र्यांनी राज्य आरोग्य मंत्र्यांना धू धू धूतले .

    Union Health Minister scolds state health minister for pretending to be vaccinated

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!