विशेष प्रतिनिधी
पुणे : वानवडी परिसरात राहणाºया एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल १३ जणांनी सामुहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या मुलीवर मुंबईत गेल्यानंतर तिच्यावर ठाण्यातील एका ३० वर्षाच्या तरुणाने तिला घरी घेऊन जाऊन लैगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.Unfortunately, the girl who was raped at Pune station, was also sexually abused in Mumbai
पुणे स्टेशन येथे मित्राला भेटायला गेलेल्या एका १४ वर्षाच्या मुलीला घरी सोडतो, असे सांगून एका रिक्षाचालकाने रिक्षाने नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी तिच्यावर दोन दिवस अत्याचार केले होते. वानवडी पोलिसांकडे तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून तिच्या मित्रासह १४ जणांना अटक केली आहे.
वानवडी पोलिसांना तपासादरम्यान मुंबईतही मुलीवर बलात्कार झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी आरोपीची माहिती मिळवून त्याला मुंबईतून अटक केली आहे.घरी सोडतो असे म्हणत एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी पोलीसांनी १३ जणांना अटक केली होती.
३१ ऑगस्टला ही १४ वर्षीय मुलगी तिच्या मित्राला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी पुणे रेल्वेस्टेशन जवळ आली होती. तिचा मित्र भेटण्यासाठी आला नाही.दरम्यान, मुलगी एकटी असल्याचं पाहून एका रिक्षावाल्याने घरी सोडतो असे म्हटले. मुलीला रिक्षात बसवून रिक्षा चालकाने तिला लॉजवर नेले. त्यानंतर त्याच्या साथीदारांना बोलावून दोन दिवस विविध ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्या मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून दिलं.
मुलीच्या वडीलांनी दुसऱ्या दिवशी मुलगी हरवल्याची तक्रार वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिचा जबाब घेतला. याच मुलीवर मुंबईतही लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.
Unfortunately, the girl who was raped at Pune station, was also sexually abused in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी यांचा कॉँग्रेसच्या खासदारांवरच भरवसा, वैतागून अॅडव्होकेट जनरलने दिला राजीनामा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप