Chhota Rajan corona Positive : तिहारच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात कैदेत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण झाली आहे. तुरूंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सध्या त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. Underworld don Chhota Rajan corona Positive, jailed in Tihar High Security Cell
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तिहारच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात कैदेत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण झाली आहे. तुरूंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सध्या त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर छोटा राजनची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. गुरुवारी छोटा राजनला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. छोटा राजनला लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांना कोरोना तपासणी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
छोटा राजनला कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तास तिहार जेलचे महासंचालक संदीप गोयल यांनी दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्याची प्रकृती ठीक आहे आणि तुरुंगातील रुग्णालयातच त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी तुरुंगातील क्रमांक दोनच्या याच सिक्युरिटी सेलमध्ये बिहारचे बाहुबली आणि माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
तुरुंग रुग्णालयात उपचारांनंतर त्यांना दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही तुरुंग क्रमांक दोनच्या हाय सिक्युरिटी सेलमध्ये बंद आहेत. दोघांची सुरक्षा खूपच कडेकोट आहे. तुरुंगातील विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच दोघांना भेटण्याची परवानगी आहे.
तिहारच्या तुरुंग क्रमांक दोनमध्ये रुग्ण आढळल्यानंतर छोटा राजनलाही संसर्ग झाला. लक्षणे जाणवतच त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. तुरुंगाधिकाऱ्यांच्या मते, तुरुंग क्रमांक दोनमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या कैद्यांना वेगळे ठेवले जात आहे. त्यांची टेस्टही केली जात आहे. त्याचबरोबर कारागृह रुग्णालयाच्या डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त कैद्यांची कोरोना टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Underworld don Chhota Rajan corona Positive, jailed in Tihar High Security Cell
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाचा हाहाकार : देशात एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक 3.46 लाख रुग्णांची नोंद, 2624 जणांचा मृत्यू
- वसुली प्रकरण : CBIने अनिल देशमुखांविरूद्ध दाखल केली FIR, अनेक ठिकाणी छापेमारी
- पुण्यातील पोलिस मुख्यालयातील हॉस्पिटलमध्ये दहा ऑक्सिजन बेड सुविधा ; पोलिसांना दिलासा
- आमने-सामने : राजेश टोपेंच्या ‘त्या’ असंवेदशील विधानावर प्रविण दरेकर यांचा संताप -जनतेच्या दुःखावर मीठ चोळणारी वक्तव्य तरी करू नका !
- आणि सोनू सूदने तिला एअर अॅम्ब्यूलन्सने नागपूरहून हैद्राबादला पोहोचविले