प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या दबावामुळे पोलीस एकआयआर मधले प्रश्न विचारत नाहीत, तर वैयक्तिक चौकशी करत राहतात असे शरसंधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.Under government pressure, the police conduct personal inquiries, not according to the FIR; Praveen Darekar’s Tikastra
पोलिसांना अर्ध्या तासांची त्रोटक माहिती घ्यायची असते. परंतु पुन्हा बोलवायचे आणि चार-चार तास बसवून ठेवायचे अशी पोलिसांची सरकारच्या दबावाखाली चौकशी सुरू आहे. तेच तेच मुद्दे विचारून चौकशी करण्याचा प्रयत्न होता. छळवाद मांडायचा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ज्या कारवाया होत आहेत त्या क्रियेला प्रतिक्रिया, अशा प्रकारची सूडभावनाच या सगळ्या गोष्टींच्या मागे असून माझ्यावर कारवाई सुरू आहे, असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
आघाडीच्या दबावाखाली पोलिस
प्रवीण दरेकर यांची सोमवारी दुसऱ्यांदा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. दुपारी १२ च्या सुमारास पदरेकर पोलीस ठाण्यात उपस्थित राहिले. त्यांची सुमारे अडीच तास पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, पोलिसांनी आज केलेल्या चौकशीत एफआयआर संबंधित काहीही माहिती विचारली नाही. केवळ व्यक्तीगत चौकशी केली. व्यक्तिकेंद्रित छळवाद मांडण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली असलेली पोलिसांची मानसिकता आजच्या चौकशीत दिसली.
काय म्हणाले दरेकर?
मी पहिल्या दिवसांपासून सांगत आहे, आम्ही लोकशाही मानणारे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही संजय राऊतांसारखे आक्रस्ताळे नाही. त्यांना चौकशीला बोलावल्यावर काय नंगा नाच करतात ते आपण पाहिले आहे. पोलीस जेव्हा चौकशीला बोलावतात तेव्हा मी चौकशीला जातो आहे. पण त्यांना पोलीस कस्टडी का हवी आहे?
त्यांच्या नेत्यांवर ज्या कारवाई होतात. त्याला काऊंटर म्हणून आमच्यावर दबाव आणण्यासाठी हे सर्व सुरू आहे. जी माहिती अर्ध्या तासात देऊ शकतो त्यासाठी पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावून तासनतास बसवून ठेवत आहेत. हा सूडाच्या भावनेतून छळवाद सुरू आहे. मात्र आम्ही कायद्याला प्रतिसाद देण्यास तयार आहोत. ज्या ज्या वेळी पोलिसांना सहकार्य लागेल तेव्हा सहकार्य करू, असे प्रविण दरेकर म्हणाले.
सोमय्या पळून जाणारे नाहीत
किरीट सोमय्या सध्या कुठे आहेत, असे विचारले असता ते म्हणाले, किरीट सोमय्या पळून जाणारा माणूस नाही. तो पळवणरा नेता आहे. त्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तो लपणारा नेता नाही, असे उत्तर दरेकर यांनी दिले. विरोधकांच्या मनात देवेंद्र फडणवीसांचा एवढा मत्सर आहे की, त्यामुळे यांना रोज देवेंद्र फडणवीस यांचे नाव घ्यावेच लागते. त्यामुळे रोज सकाळी फडणवीसांवर टीका करायची, मोदी सरकारवर टीका करायची याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
Under government pressure, the police conduct personal inquiries, not according to the FIR; Praveen Darekar’s Tikastra
महत्त्वाच्या बातम्या
- RamNavmi JNU : जेएनयूमध्ये रामनवमीला मांसाहार वाद आणि पुण्यात नास्तिक परिषदेच्या आग्रहातून जिहादी मानसिकतेचेच भरणपोषण!!
- Sharad Pawar : “सिल्वर ओक”वर दगड – चप्पल फेक – एसटी कर्मचारी – राऊत – “मातोश्री” व्हाया राष्ट्रवादी…!!; हल्ल्याची वळणे आणि “वळसे”!!
- ST Mastermind?? : दगडफेक – चप्पल फेक सिल्वर ओकच्या रस्त्यात; राजकीय लाभाची फळे राष्ट्रवादीच्या पदरात!!
- ST – Telco – Pawar : एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री आझाद मैदानातून हाकलले; पवारांनी टेल्को संप पहाटे मोडल्याची आठवण!!