विशेष प्रतिनिधी
पुणे : उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, पवार काका – पुतण्या आणि आत्यामध्येच कार्यकर्त्यांनी लावले मुख्यमंत्रीपदाचे रेसिंग!!, असे पवार घराण्यातच घडत आहे. uncle and nephew race for chief minister
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आपली पकड मजबूत करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंबाच्या बळावर ते महाराष्ट्र चालवताहेत. पण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मात्र मुख्यमंत्रीपदासाठी प्रचंड उतावीळी सुरू आहे. कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या गुडघ्याला मुख्यमंत्रीपदाची बाशिंगे बांधत आहेत.
आतापर्यंत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नावापुढे भावी मुख्यमंत्री लिहून कार्यकर्त्यांनी मोठ-मोठी पोस्टर्स लावली होती. पुण्यातल्या एका पदाधिकाऱ्याने तर गणेशोत्सवाच्या देखाव्यात अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन टाकली. पण आता त्यामध्ये भर म्हणून पवार कुटुंबातले पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांच्या नावाच्या अलीकडे भावी मुख्यमंत्री डकवून पुणे – मुंबई रस्त्यावर त्यांचे भले मोठे फ्लेक्स लावले आहेत. यातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आपण पवार कुटुंबातच रेस लावत आहोत याचेही भान कार्यकर्त्यांना उरले नसल्याचे दिसते.
गेली 30 – 32 वर्षे शरद पवार जसे भावी पंतप्रधान आहेत, तसेच पवार कुटुंबात आता पाठोपाठ एक असे तीन भावी मुख्यमंत्री उगवले आहेत. पण शरद पवारांच्या पंतप्रधान पदाची अखेरीस दिल्लीत राजकीय वर्तुळात खिल्ली उडवली जाऊ लागली. कारण त्यांना नंतर कोणी पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये गांभीर्याने घेईनासे झाले. पवारांचे पंतप्रधानपद हिंदी – इंग्रजी माध्यमांच्या चर्चेतून केव्हाच आऊट झाले. नंतर ते फक्त मराठी माध्यमांच्या चर्चांमध्ये उरले आणि आता तेही संपुष्टात आले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देखील अशी उघडपणे पोस्टरवर नावे लिहून राष्ट्रवादीचे समर्थक स्वतःचे समाधान करून घेत असतील, पण त्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांमध्ये ही पोस्टर्स आता करमणुकीची साधनेच बनली आहेत. राष्ट्रवादी अखंड असताना त्यांना 71 पेक्षा जास्त आमदार कधी मिळाले नाहीत. दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांच्या मुत्सद्देगिरीपुढे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला शरणागतीच पत्करावी लागली. त्यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधीही करता आला नाही. पण आता कार्यकर्ते आपापल्या नेत्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून नाव पोस्टरवर लिहून आपले स्वतःचेच समाधान करून घेत आहेत.
uncle and nephew race for chief minister
महत्वाच्या बातम्या
- नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, शाळांना सुटी जाहीर; अंबाझरीसह गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने घरांमध्ये शिरले पाणी
- JDS एनडीएत सहभागी; अमित शहांना भेटल्यानंतर कुमारस्वामींची घोषणा, म्हणाले- आमची कोणतीही मागणी नाही
- लालू, राबडी, तेजस्वीसह 17 जणांना समन्स; लँड फॉर जॉब्स प्रकरणात 4 ऑक्टोबरला हजर राहावे लागणार
- बिधूडीने फिजूल हुसका दी है मक्खी; उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपाला ढकलले I.N.D.I आघाडीत!!