प्रतिनिधी
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या अर्धवट काम झालेल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यापेक्षा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याचे काम करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणाऱ्या शरद पवार यांना केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार काय म्हणतात? हे पाहण्यापेक्षा भारतीय विद्यार्थी सुरक्षित परत आणणे अधिक महत्त्वाचे आहे, अशा शब्दांमध्ये भागवत कराड यांनी शरद पवारांना सुनावले आहे.Ukraine Indian Students
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पुण्यातल्या मेट्रोचे उद्घाटन होत आहे. त्यांचे अनेक कार्यक्रम पुण्यात होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना राजकीय चिमटे काढले. मेट्रोचे काम अर्धवट असताना पंतप्रधान मोदी त्याच्या उद्घाटनाला येत आहेत. ठीक आहे. आमचा आक्षेप नाही, असा टोला त्यांनी हाणला होता.
शरद पवारांच्या या राजकीय चिमट्याला डॉ. भागवत कराड यांनी प्रत्युत्तर दिले. डॉ. कराड म्हणाले पंतप्रधान मोदींनी युक्रेन मधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेन भोवतालच्या चार देशांमध्ये पाठविले आहेत. मिशन गंगा युद्धपातळीवर सुरु आहे. 11000 पेक्षा अधिक विद्यार्थी भारतात येऊन दाखल झाले आहेत. शरद पवारांना हे सगळे माहिती आहे, तरी देखील ते मुद्दामून टीका करत आहेत. त्यामुळे ते काय बोलतात?, हे पाहण्यापेक्षा भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मधून सुरक्षित परत आणणे अधिक महत्त्वाचे आहे, असा प्रतिटोला डॉक्टर कराड यांनी पवार यांना लगावला.
Ukraine Indian Students
महत्त्वाच्या बातम्या
- Pune Metro fare : पुणेकरांसाठी मेट्रोचा प्रवास स्वस्त आणि मस्त… पहा भाडे किती?
- Sharad Pawar – Nawab Malik : नवाब मलिकांच्या अटकेची शरद पवारांकडून नारायण राणेंच्या अटकेशी तुलना…!!
- PM Modi – Sharad Pawar : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा राष्ट्रवादीला नेमका कुठे खुपतोय…
- Sharad Pawar : राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशात फिरकलेही नाहीत, पण निकालाबाबत ज्योतिषाचा आधार घेत नाही, म्हणाले!!