प्रतिनिधी
मुंबई : मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला गेल्या 25 वर्षांत प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही, असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हाणला आहे.Uddhav Thackeray’s Shiv Sena will not go beyond 50 in the Mumbai municipal elections; Ashish Shelar’s troupe
मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे संपन्न झाली. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पुनम महाजन, खासदार मनोज कोटक, महामंत्री संजय उपाध्याय, आमदार अमित साटम, आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, आमदार पराग अळवणी, आमदार कालिदास कोळंबकर आमदार मनीषाताई चौधरी, आमदार भारती लव्हेकर, आमदार विद्या ठाकूर, आमदार राजहंस सिंह, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, जयप्रकाश ठाकूर, चित्राताई वाघ, माजी खासदार किरीट सोमय्या, सुनील कर्जतकर, केशव उपाध्ये, गटनेते प्रभाकर शिंदे, राज पुरोहित, मधू चव्हाण आदी उपस्थित होते.
शेलार म्हणाले, मुंबई शहरातील आमच्यावर टीका करणारे काहीजण म्हणायचे कधीतरी लोकांचे ऐका मन की बात लोगो की सूनो… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “मन की बात” मुंबई शहरात 10000 ठिकाणी ऐकली गेली. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा प्रवास दौरा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आमचं अन्य पक्षांना आव्हान आहे की, भाजपाच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेला 10000 संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. गरजू महिलांना तसेच 27000 कुटुंबांना मदत केली. सलग 15 दिवसांत 9 मोठे कार्यक्रम अन्य कुठल्या पक्षाला जमू शकत नाहीत तेवढे आपण केले.
नरेंद्र मोदी देशाला लाभलेले दुर्लभ नेतृत्व
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. विरोधकांच्या पोटात दुखते. त्यांना त्रास होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन मोदींना म्हणातात, तुम्ही चांगली लोकशाही राबवत आहात. आपण पुढच्या महिन्यात भोजनासाठी वॉशिंग्टनमध्ये भेटत आहोत. अमेरिकेतील उच्च वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. हे दुर्लभ नेतृत्व आपल्याला मिळाले आहे, असेही शेलार म्हणाले.
Uddhav Thackeray’s Shiv Sena will not go beyond 50 in the Mumbai municipal elections; Ashish Shelar’s troupe
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क