• Download App
    Uddhav Thackeray Shivasena Communist Alliance Patriotism शिवसेना आणि कम्युनिस्ट एकत्र येण्यामागे देशप्रेमाचा धागा

    Uddhav Thackeray : शिवसेना आणि कम्युनिस्ट एकत्र येण्यामागे देशप्रेमाचा धागा; उद्धव ठाकरेंचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध

    Uddhav Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Uddhav Thackeray स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील यशवंतराव सेंटर येथील राज्यव्यापी परिषदेत भाषण करत अनेक विषयांना हात घातला. तसेच जन सुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवत सरकारवर टीका केली आहे.Uddhav Thackeray

    उद्धव ठाकरे म्हणाले, राजकारणात मतभेद आहेतच, पण मी याला मतभिन्नता म्हणतो. आणखी कोणीतरी म्हणेल की उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर काय करत आहेत. डाव्यांच्या व्यासपीठावर म्हणजे कम्युनिस्टांच्या व्यासपीठावर. शिवसेना आणि कम्युनिस्टचा भयंकर संघर्ष झालेला आहे. कालांतराने कळते की ज्या कारणासाठी लढत आहोत, ते कारण बाजूलाच राहते आणि आपण उगाचच आपल्यात भांडत आहोत. राजकारणात व्यक्तिगत द्वेष असता कामा नये. म्हणूनच मी पवार साहेब किंवा कम्युनिस्ट एकत्र का येऊ शकलो, कारण देशप्रेम हा एक कॉमन धागा आमच्यात आहे.Uddhav Thackeray



    पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जे कोणी देशद्रोही असेल त्याला फासावर लटकावलेच पाहिजे, यात दुमत असूच शकत नाही. सरकार जो कायदा आणत आहे, तो कायदा मी पण वाचला आहे. त्यात देशद्रोह्याचा उल्लेखच नाही. सुरुवातीच्या पॅराग्राफमध्ये दोन वेळा ‘कडव्या डाव्या’ असा उल्लेख केला गेला आहे. म्हणजे काय? कडवे डावे काय आणि उजवे काय? आपल्या संविधानात याचा उल्लेखच नाही. एकतर कळत आहे की या भाजपचे स्वातंत्र्य चळवळीत काही योगदानच नव्हते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही हे नव्हते. आयत्या बिळावर नागोबा म्हणून बसले आहेत आणि लोकांकडून दूध पाजायची अपेक्षा करत आहेत.

    वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर संघ परिवार दिसलाच नसता

    भाजपने कोणते आदर्श निर्माण केले नाहीत, कसलेही योगदान नाही मग काय करायचं तर दुसऱ्यांचे आदर्श चोरायचे. मग जरा कुठे काही झाले की म्हणतात हे नेहरूंच्या काळात झाले आहे. अमुक-अमुक झाले की लगेच हे नेहरूंच्या काळात झाला आहे, अहो तुमचा जन्म सुद्धा नेहरूंच्याच काळात झाला आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना डिवचले. यात नेहरूंचा काय दोष? आता जर नेहरूंना दोष देणार असाल तर आता 11 वर्षे झाली तर तुम्ही काय केले? तेव्हा वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज हा संघ परिवार दिसलाच नसता. कारण त्यावेळेला वल्लभभाई पटेल यांनी संघ परिवारावर बंदी घातली होती. मग आता बोला नेहरू पाहिजे होते की वल्लभभाई पटेल पाहिजे होते. दहशतवाद किंवा देशद्रोहाच्या विरोधातील कायदा आणणार असाल तर त्याला आमचा पाठिंबा आहे.

    घरात पैशांची बॅग सापडली तेव्हा मंत्र्याला का अटक नाही केली?

    जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करत असेल, मग त्याचा जात धरण बघू नका. त्याचा देशद्रोही हाच धर्म आणि लटकवा त्याला फासावर आम्ही पाठिंबा देतो. आजची एक बातमी वाचली, वसई विरारच्या माजी आयुक्ताच्या घरात पैशांची बॅग सापडली, त्याला अटक केली. मग मंत्र्यांच्या घरात पैशांची बॅग सापडली तेव्हा मंत्र्याला का अटक नाही केली? त्याला समज देऊन सोडून देतात. पुढच्या वेळी बॅग अशी उघडी नको ठेवत जाऊ सांगत असतील, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी लगावला.

    माकडं संसदेत पोहोचली

    उद्धव ठाकरे म्हणाले, कोणी कबुतरांच्या मागे लागले आहे, कोणी कुत्र्याच्या मागे लागले आहे. कुत्र्याच्या मागे लागल्यावर आज त्याच्यावर खंडपीठ नेमले गेल्याचे समजले. सुप्रीम कोर्टाला यासाठी मी धन्यवाद करतो. काल आपल्या सरन्यायाधीशांनी सांगितले की पूर्वी एका खंडपीठाने निकाल दिला असला तरी मी पुन्हा यात लक्ष घालेल. सुप्रिया तू तर दिल्लीत असते तुला दिल्लीचे कुत्रे चांगले माहीत असतील. मनेका गांधी म्हणाल्या की रस्त्यावरचे कुत्रे पकडले तर झाडवरची माकडे खाली येतील. मी म्हणलं अहो ती माकडं संसदेत पोहोचली सुद्धा, असे म्हणताच एकच हशा पिकला.

    देश पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दिशेने

    सुप्रीम कोर्टाच्या दारात लोकशाही मारायला आली आहे. हा देश पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दिशेने चालला आहे. मला जे काही दिसत आहे ते फार भयानक आहे. यांची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे. आज हे कायदे गोंडस नावाने आणत आहेत, लोकांना वाटणार हे आपल्यासाठी नाही. चीनमध्ये एखादा माणूस कळत नकळत तिथल्या सरकारच्या विरोधात बोलला तर तो व्यक्ती गायब होतो, असे मी ऐकले आहे.

    स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर संघर्ष करावाच लागणार

    स्वातंत्र्य आपल्याला असे तसे नाही मिळाले. बलिदान दिले तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळाले आहे. ते जे कोणी आपल्यासाठी लढले, त्यांना आपल्यासाठी लढत आहोत हे माहीत नव्हते. ते देशासाठी लढले. काय विचार केला असेल त्यांनी? माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे त्यांनी म्हटले. हे स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर संघर्ष करावाच लागणार आहे.

    Uddhav Thackeray Shivasena Communist Alliance Patriotism

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    HSRP : राज्यातील वाहनधारकांना मोठा दिलासा; HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख आता 30 नोव्हेंबर

    Pune Police : पुण्याचे पोलीस केवळ दंड वसूल करण्यासाठी आहेत का ?

    मुंबईत बीडीडी चाळवासीयांची स्वप्नपूर्ती; 556 घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण