‘…तर त्यांनी त्यांच्या कुत्र्याला भूंकायला लावावं’’ असंही किरण पावसकरांनी माध्यमांसमोर म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांचं एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे. त्यांच्या या विधानामुळे हिंदू बांधवांच्या विशेषता रामभक्तांच्या भावना दुखावल्याचे दिसून येत आहेत. ‘’रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटतंय.’’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. ज्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे. तर आव्हाडांच्या या वक्तव्यावरून शिवसेना(शिंदे गट) नेते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. Uddhav Thackeray says he has not shunned Hindutva so will he stop Jitendra Ahwad from making such anti Hindu remarks Kiran Pawaskar
‘’उद्धव ठाकरे म्हणतात, मी हिंदुत्वापासून दूर गेलेलो नाही. मग ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांना हिंदूंच्या विरोधातील विधानं करण्यापासून रोखतील का? नाहीतर त्यांनी किमान हिंदुत्व सोडलं नाही, हे नाटक तरी बंद करावं. ते जर स्वत: हे सांगू शकत नसतील, तर त्यांनी त्यांच्या कुत्र्याला भूंकायला लावावं.’’ अशा शब्दांमध्ये किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
याशिवाय काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत, त्यांचा समाचार घेतला होता. ‘’ते विधान अतिशय आक्षेपार्ह आहे. रामभक्तांचा अपमान आहे. समस्त समाजाचा अपमान आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील, याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असे काही ठरवले आहे का की दंगली घडवायच्या? किमान नेत्यांनी संवेदनशीलतेने वागले पाहिजे.’’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? –
“रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे. खरं तर येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल कारण सत्ताधारी देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. महागाई कमी करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे धार्मिक सोहळे करून मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray says he has not shunned Hindutva so will he stop Jitendra Ahwad from making such anti Hindu remarks Kiran Pawaskar
महत्वाच्या बातम्या
- सत्यपाल मलिकांना मिळालेल्या CBIच्या समन्सवर गृहमंत्री अमित शाहांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- … ही तर वरवरची मलमपट्टी: गांभीर्य असेल तर आरक्षण मर्यादेविषयी भूमिका स्पष्ट करा! अशोक चव्हाण
- … तेव्हा राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती का?; हिंदु जनजागृती समितीचा सवाल
- अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…