प्रतिनिधी
मुंबई : मूळ सत्ता सोडवता सोडवेना अशी अवस्था सध्याच्या ठाकरे – पवार सरकारची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा न देता फक्त वर्षा बंगला सोडला आहे, तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली सरकारी गाडी सोडून दिली आहे. Uddhav Thackeray didn’t resign but only left official residence and ajit Pawar left only official car
एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले. त्यानंतर त्यांनी आपले शासकीय वर्षा बंगला सोडला. मुख्यमंत्र्यांनी काल रात्री शासकीय बंगला सोडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली शासकीय गाडी सोडल्याची बातमी आली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला राजीनामा देणार का, अशा चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सोडला ‘वर्षा’ बंगला
माझ्याच पक्षातल्या माझ्या माणसांना मी नको असेन तर मग काय करायचं? माझ्या लोकांना जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर त्यांनी ते सुरत आणि इतर ठिकाणी जाऊन बोलण्यापेक्षा मला समोर येऊन सांगायचे होते. त्यांच्यापैकी एकाही आमदाराने मला सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्रीपदी तुम्ही नको, तर मी आता माझा राजीनामा द्यायला तयार आहे. यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीला हलवत आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये केले होते. त्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री आपला मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवला.
– राष्ट्रवादी-काँग्रेसच्या हालचाली
त्यानंतर आता उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपले शासकीय वाहन सोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार हे आपल्या खासगी वाहनातून आपल्या निवासस्थानाबाहेर पडल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपली सुरक्षाही मागे ठेवली. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मंत्रालयातील अर्धवट कामांच्या फायलींचा निपटारा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातले सरकार कोसळण्याची दाट शक्यता पुन्हा एकदा वर्तवण्यात येत आहे.
Uddhav Thackeray didn’t resign but only left official residence and ajit Pawar left only official car
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला खिंडार : उद्धव ठाकरेंच्या इमोशनल ड्रामाला एकनाथ शिंदेंचे वास्तववादी उत्तर!!; अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा!!
- फेसबूक स्क्रिप्ट राईटर : एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्याचा उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा सल्ला!!
- शिवसेनेला खिंडार : मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह हा बंडखोर आमदारांशी असफल संवाद; मुनगंटीवारांचे शरसंधान
- शिवसेनेला खिंडार : उद्धव ठाकरे उरले आता काँग्रेस – राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री!!