• Download App
    Uddav Thakckrey's micro planning for Mumbai municipal election ठाकरे बंधू एकत्र येवोत किंवा न येवोत,

    ठाकरे बंधू एकत्र येवोत किंवा न येवोत, महाविकास आघाडी होवो किंवा न होवो, उद्धव ठाकरेंनी मांडले 300 चे गणित!!

    Uddav Thakckrey

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Uddav Thakckrey महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येवोत किंवा न येवोत, महाविकास आघाडी होवो किंवा न होवो उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचे 300 चे गणित मांडून शाखाप्रमुख यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कामाला लावले.Uddav Thakckrey’s micro planning for Mumbai municipal election

    मुंबई महापालिकेतल्या 227 प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात साधारणपणे 45000 ते 55000 मतदार असल्याचे गृहीत धरून पुढचे सर्व दिवस रोज 300 घरांमधल्या मतदारांना भेटण्याचे नियोजन सर्व शाखाप्रमुखांनी करावे असे आदेश उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना दिले. शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर पडलेल्यांना धडा शिकवण्याचा मोका गमावू नका. गद्दारांना घरी बसवा. बाळासाहेबांची आण राखा, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.



    महाराष्ट्रात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी राजकीय वातावरणात चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात पटावरची प्यादी आणि मोहरे अजून हललेलेच नाहीत‌. पण म्हणून महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणूका येऊन ठेपायच्या राहणार नाहीत, हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना प्रत्यक्ष जमिनी स्तरावर काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यामध्ये त्यांनी पुढचे सगळे दिवस दररोज किमान 300 घरातल्या मतदारांना भेटायचे टार्गेट ठेवा, असे आदेश दिले. शिवसेना पक्षाचे काम लोकांना माहिती असले तरी आपण घराघरांमध्ये जाऊन संपर्क वाढवून ते काम लोकांच्या मनावर ठसवले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

    उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत जमिनीस्तरावर बारकाईने काम करून मुंबई महापालिकेत किमान तीन वेळा विजय मिळवला आहे. त्या अनुभवाचा वापर करून उद्धव ठाकरेंनी शाखाप्रमुखांना मतदार संपर्क अभियानाचा बारकावा समजून सांगितला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा जास्त लाभ होईल आणि एकत्र आले नाही तर फारसा तोटा होणार नाही, याची काळजी उद्धव ठाकरे यांनी या निमित्ताने घेतली आहे.

    Uddav Thakckrey’s micro planning for Mumbai municipal election

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा