• Download App
    उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण, आईला भेटण्यासाठी आले होते अधिवेशन अर्ध्यावर सोडून|Udayan Raje Bhosale corona positive

    उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण, आईला भेटण्यासाठी आले होते अधिवेशन अर्ध्यावर सोडून

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : राज्यसभेतील भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या आई कल्पनाराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना भेटण्यासाठी ते अधिवेशन सोडून आले होते. चार दिवसांपूर्वी दिल्लीतून परतल्यानंतर उदयनराजेंना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.Udayan Raje Bhosale corona positive

    खासदार उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या सुरुवातीला करोनाबाधित झाल्या होत्या. उपचाराअंती करोनावर मात केल्यानंतर कल्पनाराजे भोसले यांना घरी सोडण्यात आलं. मात्र पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.



    मातोश्री कल्पनाराजेंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्याने खासदार उदयनराजे दिल्लीहून अधिवेशन सोडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते.यावेळी उदयनराजे हे देखील संपर्कात आल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला आणि करोनाची काही लक्षणेही आढळली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

    आता उदयनराजे यांची प्रकृती उत्तम असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितलं. मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली असून त्या घरी परतल्या आहेत. तसंच, पुढील एक-दोन दिवसात उदयनराजेंनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

    Udayan Raje Bhosale corona positive

    महत्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल