• Download App
    मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमावरून दोन शिवसेना आमने - सामने!!|Two Shiv Sena face each other on Marathwada Mukti Day program!!

    मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमावरून दोन शिवसेना आमने – सामने!!

    प्रतिनिधी

    संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम सुवर्ण महोत्सव निमित्ताने संभाजीनगर मध्ये झालेल्या अधिकृत शासकीय कार्यक्रमाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिवसेनेचा शिंदे गट आमने-सामने आले आहेत, ते देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झाल्याच्या कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून!!Two Shiv Sena face each other on Marathwada Mukti Day program!!

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानात शासकीय ध्वजारोहण झाले. या ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री यांनी मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे आश्वासन दिले. त्याच त्याचवेळी त्यांनी मराठवाड्याच्या महत्त्वाकांक्षी पाणी योजना संदर्भात देखील महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. परंतु हा कार्यक्रम सकाळी लवकर उरकण्यात आला. नियोजित वेळेत म्हणजे 9.00 वाजण्याऐवजी आयोजित 7.00 वाजताच उरकून घेतला असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. पातशहा हैदराबादच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तिथे मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहायचे होते, म्हणून संभाजीनगर मधला कार्यक्रम लवकर उरकून घेतला, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हैदराबाद मध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहायचे होते म्हणून मराठवाड्यातल्याच कार्यक्रम लवकर आटोपता घेतला, असा आरोप दानवे यांनी केला आहे.



    त्यानंतर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी ज्या मुक्तिस्तंभावर जाऊन पुष्पचक्र वाहिले आणि त्याच्या अभिवादन केले तेथेच पुन्हा जाऊन अभिवादन केले. मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन गट असे आमने-सामने आले होते.

    एकनाथ शिंदे यांच्या घोषणा

    मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा सुवर्ण महोत्सवानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण समारोह पार पडला. यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्रामात शहीद झालेल्या तमाम सेनानींना विनम्रतापूर्वक अभिवादन केले.

     

    मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा निश्चितच सोपा नव्हता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या लढ्याचे लोण संपूर्ण मराठवाड्यात पसरले आणि या लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन रझाकारीतुन आपली मुक्तता करून घेतली. मराठवाडा आज उद्योग, पर्यटन, पर्यावरण या सर्वच बाबतीत समृद्ध असला तरीही विकासाच्या बाबतीत अद्यापही मागे राहिला आहे. या भागाचा सुनियोजितपणे विकास करून मराठवाड्यातील विविध विकासकामांना राज्य शासनाकडून कशाप्रकारे प्राधान्य देण्यात येणार असल्याचे विस्तृत विवेचन यासमयी केले. येणाऱ्या काळात या भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मनोगत यावेळी बोलताना व्यक्त केले.

    याप्रसंगी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड जी, माजी विधानसभा अध्यक्ष आणि आमदार हरीभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जीएसटीचे सह-आयुक्त जी. श्रीकांत, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने , यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वर म्हटले आहे.

    Two Shiv Sena face each other on Marathwada Mukti Day program!!

    महत्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस