• Download App
    मुंबईत युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात तुफान राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकल्या! Two groups clashed at the Youth Congress meeting in Mumbai threw chairs at each other

    मुंबईत युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात तुफान राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकल्या!

    घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; राष्ट्रीय अध्यक्षांसमक्षच  कार्यकर्ते आपसात भिडले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  युवक काँग्रेसची बैठक सुरू असताना दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन्ही गटातील संतप्त कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याचेही दिसून आले. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून, तो चांगलाच व्हायरलही होत आहे. Two groups clashed at the Youth Congress meeting in Mumbai threw chairs at each other

    या बाबत एएनआयने  दिलेल्या वृत्तानुसार मुंबईत  युवक काँग्रेससच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी युवक काँग्रेसचे अनेक  नेते, पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात एक गट आक्रमक झाला, शिवाय युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी कुणाल राऊत यांना हटवण्याचीही मागणी केली.

    याननंतरर कुणाल राऊत समर्थकांनी याला विरोध दर्शवला आणि दोन्ही गटात वाद उद्भवला. थोड्यावेळात त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. सभागृहातच दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर खुर्च्या फेकू लागले. विशेष म्हणजे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांच्या समक्षच  हा सगळा प्रकार घडत होता.

    Two groups clashed at the Youth Congress meeting in Mumbai threw chairs at each other

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!