• Download App
    Nashik BJP ठाकरे बंधूंची युती झाल्यावर नाशिक मध्ये शिवसेना, मनसेच्या दोन माजी महापौरांचा जल्लोष, आज भाजपमध्ये प्रवेश; पण भाजपच्या निवडणूक प्रमुखांचा विरोध!!

    ठाकरे बंधूंची युती झाल्यावर नाशिक मध्ये शिवसेना, मनसेच्या दोन माजी महापौरांचा जल्लोष, आज भाजपमध्ये प्रवेश; पण भाजपच्या निवडणूक प्रमुखांचा विरोध!!

    नाशिक : ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर नाशिक फार मोठे राजकीय नाट्य घडले. शिवसेना आणि मनसेच्या दोन माजी महापौरांनी काल‌ मोठा जल्लोष केला. पण आज भाजपमध्ये प्रवेश केला. पण या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक निवडणूक प्रमुखांनी जाहीर विरोध केला. नाशिक भाजप मधले मतभेद यानिमित्ताने जाहीरपणे समोर आले.

    नाशिक मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे सूत्रे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली. त्यांनी आपकी बार 100 पार अशी घोषणा देत घाऊक पक्षप्रवेश करून घेतले. यात त्यांनी स्थानिक नेतृत्वाला सुद्धा विचारात घेतले नाही. उलट स्थानिक आमदारांना ठिकठिकाणी स्पर्धा निर्माण करतील, अशा नेत्यांचे प्रवेश गिरीश महाजन यांनी घडवून आणले. यातलीच पुढची कडी म्हणून नाशिक मध्ये आज शिवसेना उबाठा गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर मनसेचे माजी महापौर यतीन वाघ आणि काँग्रेसचे नेते शाहू खैरे हे सुद्धा भाजपमध्ये दाखल झाले. यतीन वाघ यांचा हे चौथे पक्षांतर आहे.

    – सुनेचे तिकीट कापल्यामुळे विनायक पांडे भाजपमध्ये

    ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर विनायक पांडे यांनी कालच मोठा जल्लोष केला होता‌ परंतु त्यांच्या सुनेला शिवसेनेने तिकीट नाकारल्या बरोबर विनायक पांडे यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये उडी मारली. त्यांनी प्रभाग क्रमांक १३ मध्ये अख्खे पॅनल तयार केले. ते निवडून आणायची तयारी चालवली. गिरीश महाजन यांनी त्यांना तिकिटाचे आश्वासन दिल्यावर त्यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश करून घेतला.



    – देवयानी फरांदे तीव्र नाराज

    पण या राजकीय नाट्यातला ट्विस्ट असा की विनायक पांडे यांच्या प्रवेशाची माहिती नवनियुक्त निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांना देण्यातच आला नाही. त्यांच्या माहितीशिवाय हा पक्ष प्रवेश झाला. त्यामुळे स्थानिक भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. देवयानी फरांदे यांनी डुएट करून आपली तीव्र नाराजी जाहीर केली. प्रभाग क्रमांक 13 मधल्या पक्ष प्रवेशाला माझा तीव्र विरोध आहे. या पक्षप्रवेशाची कोणतीही कल्पना मला दिली नव्हती. मी तिथल्या प्रस्थापितांच्या विरोधात लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या बाजूने ठाम उभी आहे, असे त्यांनी नमूद केले.

    – गिरीश महाजनांच्या विरुद्ध असंतोष

    भाजपने देवयानी फरांदे यांना सुरुवातीला निवडणूक प्रमुख केलेच नव्हते. त्यांनी आमदार राहुल ढिकले यांना निवडणूक प्रमुख केले होते. पण नंतर गिरीश महाजनांनी तो निर्णय बदलून देवयानी फरांदे यांना निवडणूक प्रमुख केले, पण प्रत्यक्षात भाजपमध्ये घाऊक पक्ष प्रवेश घेताना त्यांनाही डावलले. या सगळ्या राजकीय नाट्यामुळे भाजपच्या मूळच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी उफाळून आली. ती देवयानी फरांदे यांनी जाहीर त्यांच्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

    Two ex mayors of Nashik enters in BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    29 पैकी जास्तीत जास्त महापालिका जिंकून भाजप नंबर 1 वर राहील यात काय विशेष??; त्यापेक्षा भाजप ठाकरे, पवारांचे वर्चस्व कायमचे मोडणार का??, याला विशेष महत्त्व!!

    मुंबई महापालिकेकडे फक्त 140 PADU मशीन्स, वापरही अपवादात्मक; पण केवळ “पाडू” शब्दाला घाबरले ठाकरे!!

    Naresh Arora : अजित पवारांच्या सल्लागाराच्या कार्यालयात पोलिसांची धाड; पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केली भूमिका; तपासात आक्षेपार्ह आढळले नाही- पवार