सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पार पडली
विशेष प्रतिनिधी
Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यासाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी 203 कोटी आणि ‘अर्बन ग्रोथ सेंटर’साठी 1526 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.Pune
- Devendra Fadnavis : सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द; शिक्षक आणि कर्मचारी सेवेतून बडतर्फ
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराच्या दळणवळण विकासासाठी खालील निर्देश दिले –
१.येरवडा ते कात्रज ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा भुयारी मार्ग तयार करण्यात यावा व यासाठीचा प्रस्ताव तातडीने देण्यात यावा
२.पुणे वळण मार्ग आणि पुणे-सातारा तसेच पुणे-नगर मार्गावरून पुरंदर विमानतळास उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यात यावी
३.पुणे प्राधिकरणाचे संकेतस्थळ अद्ययावत करून अधिकाधिक ऑनलाइन सुविधा द्याव्यात आणि नागरिकांना परवडणाऱ्या दरात विकास शुल्क ठेवावे
४.पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी 500 सीएनजी बसेसच्या मागणीवर चर्चा झाली, बसेस देताना मनुष्यबळ आणि दुरुस्ती व्यवस्था सुनिश्चित करावी
५.पुणे राजभवन आवारातील जागा मेट्रोच्या उड्डाणपूल सेवेसाठी तत्काळ उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत झाला
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Twin tunnels new roads and CNG buses for Pune
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे + काँग्रेसच्या टोकाच्या विरोधापोटी महाराष्ट्राच्या राजकारणात पिकवली जातेय विश्वासघाताची पोळी!!
- Nitish Kumars : भाजपसोबतच्या संबंधांबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले…
- Mamata Banerjee : बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना ११ कोटींची नोटीस पाठवली, आणखी ३ नेते रडारवर