विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्रातील एक कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. केवळ मुंढेच नाही तर, राज्य सरकारने मंगळवारी एकूण पाच भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. Tukaram Mundhe
त्या आदेशानुसार आता तुकाराम मुंढे यांची असंघटित कामगार आयुक्त पदावरून, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही त्यांच्या २० वर्षाच्या कार्यकाळातील २३ वी बदली आहे. नियमानुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षात बदली होणे अपेक्षित असताना, मुंढेंची मात्र सरासरी एकाच वर्षात बदली झाल्याची दिसून येते.
मुंढेंचा कर्तव्यदक्षपणा हा जरी सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर असला तरीही प्रशासनातील इतर लोकांसाठी मात्र डोकेदुखी झाल्यामुळे, सतत त्यांची बदली केल्याचही बोललं जातंय.
दरम्यान, दिव्यांग कल्याण विभाग हा जरी दुर्लक्षित विभाग असल्याच म्हंटल जात असलं, तरीही मुंढे या खात्याचे सचिव म्हणून काम बघतील. त्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला आळा बसून, दिव्यांग बांधवांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा केली जात आहे. Tukaram Mundhe
- कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
१. तुकाराम मुंढे (आयएएस: आरआर: २००५) विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
२. नितीन काशीनाथ पाटील (आयएएस: एससीएस: २००७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना विशेष आयुक्त, राज्य कर, महारष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
३. अभय महाजन (आयएएस: आरआर: २०२२) सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
४. ओंकार पवार (आयएएस: आरआर: २०२२) सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
५. आशा अफजल खान पठाण- सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
Tukaram Mundhe’s 23rd transfer!
महत्वाच्या बातम्या
- Khalid Ka Shivaji : प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; हिंदू महासभेची सेन्सॉर बोर्डाकडे बंदीची मागणी
- Ukraine : रशियाच्या तेल डेपोवर युक्रेनचा ड्रोन हल्ला; स्फोटाचा व्हिडिओ बनवणाऱ्या दोन रशियन मुलींना अटक
- Anjali Damania : अंजली दमानियांना शिरपूर न्यायालयाचे वॉरंट; 23 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश, एकनाथ खडसे मानहानी प्रकरण
- Sanjay Nirupam : संजय निरुपम यांचा गंभीर आरोप- मुंबईत गृहनिर्माण जिहाद; जोगेश्वरी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मुस्लिम बिल्डरांकडून षडयंत्र