Tukaram Mundhe : आता दूध व्यवसायावर तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; भेसळ आढळल्यास थेट परवाना रद्द, राज्यभर कडक नियम लागू
राज्यातील अन्न सुरक्षा अधिक कठोर करण्याच्या दिशेने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि पनीर उत्पादकांवरील धडक कारवाईनंतर आता त्यांनी राज्यातील दुग्ध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे. दुधामधील भेसळ, निकृष्ट दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ‘फार्म टू प्लेट’ संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे.