• Download App
    दिशा सालियानच्या मृत्यूबाबतचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा|Truth about Disha Salian's death will come out after March 7, warns Chandrakant Patil

    दिशा सालियानच्या मृत्यूबाबतचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर: दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले हे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे स्पष्ट होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.Truth about Disha Salian’s death will come out after March 7, warns Chandrakant Patil

    दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोपावर ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. ७ मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध, पानी का पानी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.



    महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल आणि हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे.असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो असे पाटील म्हणाले.

    महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल.

    Truth about Disha Salian’s death will come out after March 7, warns Chandrakant Patil

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस