विशेष प्रतिनिधी
पुणे : सार्वजनिक वाहतूक सेवेत पीएमपीने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्या अंतर्गत १० रुपयांच्या तिकिटात २४ तास पेठांमधून प्रवास करण्याची संधी पुणेकरांना पुणे महापालिकेने दिली आहे. Travel to Pune for just Rs 10
पुणेकरांना सुलभ आणि माफक दरात प्रवास करण्यासाठी पीएमपी आणि पुणे महापलिकेने सीएनजीवर आणि एसीनी युक्त असलेल्या मिडी बस आता पुण्यात धावणार आहेत. ९ जुलैपासून या सेवेला प्रारंभ होणार असल्याची माहिती भाजपाचे नेते आणि पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
महात्मा फुले मंडई येथे बसचा लोकाअर्पण सोहळा होणार असून शहरातील पेठांच्या नऊ मार्गांवर नागरिकांना अवघ्या दहा रुपयात प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे १० रुपयांचे तिकीट २४ तास चालणार आहे.
- अवघ्या १० रुपयांमध्ये करा पुण्यामध्ये प्रवास
- शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवेत पुढचे पाऊल
- महात्मा फुले मंडईत ९ जुलैपासून सेवेला प्रारंभ
- सीएनजीवर धावणार मिडी बस
- मिडी बसमध्ये एसीतून प्रवासाची संधी
- शहरातील पेठांच्या नऊ मार्गांवर बस धावणार
- एकदा काढलेले तिकीट २४ तास चालणार आहे
Travel to Pune for just Rs 10
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकच्या डीवायएसपींची परमवीरसिंग यांच्याविरुध्द तक्रार, महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येत गुंतविल्याचा आरोप
- कम्युनिस्ट सरकारविरोधात कामगारांचा एल्गार, सरकारी दडपशाहीविरोधात किटेक्स ग्रुपच्या व्यवस्थापनाला कामगारांचा पाठिंबा
- पंतप्रधानांची आठ वर्षांची मैत्रीण करतेय वृक्षारोपणासाठी जनजागृती, चिमुरडीने आत्तापर्यंत लावली सात हजार झाडे
- चार वर्षांपूर्वी फोन टॅपींग झाल्याचा ‘अमजद खान’ नाना पटोलेंचा आरोप, सरकारने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
- काकांना मंत्रीपद दिल्यास न्यायालयात जाण्याचा चिराग पास्वान यांचा इशारा