दरेकर म्हणाले की, एसटी संपाबाबत सरकार समन्वयातून मार्ग न काढता निलंबनाचा तसेच सेवा समाप्तीचा आणि पोलीस बळाचा वापर करत आहे. Transport Minister should pave way by coordinating with ST employees: Praveen Darekar
विशेष प्रतिनिधी
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. एसटीचे विलीनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कामगार ठाम असल्याचे चित्र राज्यभरात बघायला मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील एसटी कामगार हे आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत.
मात्र हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावा या साठी राज्यसरकार कारवाई करण्याचा मार्ग अवलंबत आहे.या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून संप मागे न घेतल्यास मेस्मा म्हणजेच अत्यावश्यक सेवा कायदा अंतर्गत कारवाई करावी लागेल असा इशारा राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या या इशाऱ्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं आहे. यावेळी दरेकर म्हणाले की, एसटी संपाबाबत सरकार समन्वयातून मार्ग न काढता निलंबनाचा तसेच सेवा समाप्तीचा आणि पोलीस बळाचा वापर करत आहे.
पुढे दरेकर म्हणाले की ,मेस्मासारखी कठोर कारवाई करुन हे आंदोलन चिरडता येणार नाही. कर्मचार्यांसोबत समन्वय साधून परिवहनमंत्र्यांनी मार्ग काढावा, असे मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
Transport Minister should pave way by coordinating with ST employees: Praveen Darekar
महत्त्वाच्या बातम्या
- चिंता वाढली : ओमायक्रॉन संसर्गित रुग्ण कर्नाटकातील हॉटेलमधून पळून गेला, पोलिसांकडून शोध सुरू
- Cyclone Jawad : ‘जवाद’च्या भीतीने आंध्रच्या ३ जिल्ह्यांतून ५४ हजार जणांचे स्थलांतर, ओडिशात सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन
- OMICRON : ओमायक्रॉनमुळे पंढरपुर विठ्ठल मंदिरात ‘अलर्ट’; दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमांची सक्ती
- मुंबई विमानतळावर ८०० जणांची RTPCR चाचणी, पॉझिटिव्ह २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले ;टोपे
- डॉ. आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेच्या छपाई कामाला गती द्या!; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- नारायण राणेंच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा निर्णय ; मिळणार Z दर्जाची सुरक्षा