• Download App
    मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 5 मुले बुडाली; 2 जणांना वाचवण्यात यश; तीन बेपत्ता । total of five children had drowned during Ganpati immersion at Versova beach on sunday 3 still missing 2 in hospital

    मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 5 मुले बुडाली; 2 जणांना वाचवण्यात यश; तीन बेपत्ता

    five children had drowned during Ganpati immersion at Versova : अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान रविवारी मुंबईत मोठी दुर्घटना घडली. येथे वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गणेश मूर्तीचे विसर्जन करताना 5 मुले समुद्रात बुडाली. घटनेदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी दोन मुलांना वाचवून त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तीन मुले अद्यापही बेपत्ता आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे. total of five children had drowned during Ganpati immersion at Versova beach on sunday 3 still missing 2 in hospital


    वृत्तसंस्था

    मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान रविवारी मुंबईत मोठी दुर्घटना घडली. येथे वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गणेश मूर्तीचे विसर्जन करताना 5 मुले समुद्रात बुडाली. घटनेदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी दोन मुलांना वाचवून त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तीन मुले अद्यापही बेपत्ता आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

    बीएमसीने सांगितल्यानुसार, लाइफ बॉय आणि मनिला रोप, फ्लड रेस्क्यू टीम या तीन मुलांना शोधण्यासाठी एलईडी दिवे वापरून त्या भागात आणि आसपास फेरी बोटींचा वापर करून बचावकार्य करत आहेत. तिन्ही मुलांना शोधण्यासाठी पोलिसांच्या बोटीचीही मदत घेण्यात आली आहे. बचाव कार्यामुळे रात्री जेट्टीचे दिवेही चालू ठेवण्यात आले.

    वर्सोवा बीचवर विसर्जनाला परवानगी नव्हती

    यावेळी प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीला परवानगी दिली नव्हती, परंतु असे असूनही गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडले. वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरही विसर्जनाला परवानगी नव्हती. मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश गल्लीच्या गणपती बाप्पाचे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही बाप्पाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.

    कोविड नियमांनुसार गणेश पूजा

    मुंबईतील गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवारी दुपारपर्यंत शहरातील विविध ठिकाणी गणपतीच्या तब्बल 2,185 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात या वर्षी सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची कमाल उंची चार फूट होती आणि मिरवणुकीला परवानगी नव्हती. हे लक्षात घेऊन लालबागच्या राजाच्या गणेश गल्लीपासूनच्या मूर्तीची उंचीही चार फुटांपेक्षा जास्त नव्हती. दुसरीकडे, मुंबईतील सर्वात लोकप्रिय लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक रस्त्यावरून निघाली.

    लालबागच्या राजाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर झाले. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक हजारो गणेश भक्तांना आकर्षित करते, परंतु यावर्षी भक्तांपेक्षा जास्त पोलीस दिसले. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले होते.

    total of five children had drowned during Ganpati immersion at Versova beach on sunday 3 still missing 2 in hospital

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार