दर तीन वर्षांनी टोलची पुनरावृत्ती होत असते
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या पाच एंट्री पॉईंट्सवरील टोलच्या दरात १ ऑक्टोबरपासून १२.५ ते १८.७५ टक्के वाढ होणार आहे. दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे-मुलुंड, ऐरोली खाडी पूल आणि वाशी हे मुंबईचे पाच एंट्री पॉईंट्स आहेत. Toll at five entry points of Mumbai will increase from 12.5 to 18.75 percent from October 1
सुधारित दरानुसार मिनी बससाठीच्या टोलच्या दरात १० रुपयांनी वाढ होणार आहे, सध्या मिनी बससाठी ६५ ते ७५ रुपये टोल आकारला जातो. तर प्रवासी कार, हलकी मोटार वाहनांच्या एकेरी टोल दरात ५ रुपयांची वाढ होईल. याशिवाय ट्रक आणि बससारख्या अवजड वाहनांना आता १५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर मल्टी एक्सल वाहनांसाठी १९० रुपये आकारले जाणार आहेत.
सप्टेंबर २००२ पासून मुंबईच्या या एंट्री पॉईंट्सवर टोल आकारला जात असून आता हे शुल्क नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू असणार आहे. दर तीन वर्षांनी टोलची पुनरावृत्ती होत असते, या अगोदर १ ऑक्टबर २०२० रोजी ती झाली होती, त्यामुळे आता पुन्हा १ ऑक्टोबर रोजी पुनरावृत्ती होत आहे. तर पुढे १ ऑक्टोबर २०२६ रोजी होईल.
Toll at five entry points of Mumbai will increase from 12.5 to 18.75 percent from October 1
महत्वाच्या बातम्या
- उज्ज्वला योजनेतून 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन; मोदी सरकारची मोठी भेट
- नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!
- मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून केली हत्या, दोनजण जखमी
- उत्तर प्रदेश : लाचखोर रेल्वे अधिकाऱ्याला CBIने केली अटक, घरात सापडला नोटांचा ढीग, करोडो रुपये जप्त