• Download App
    भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला; भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरु ठेवण्याचा सोमय्या याचा इशारा Today ShivSena Activists attacked on Car of Bjp leader kirit somyya at Washim. | The Focus India

    भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला; भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरु ठेवण्याचा सोमय्या याचा इशारा

    वृत्तसंस्था

    मुंबई : माझ्या वाशीम दौऱ्यावेळी शिवसेनेच्या गुंडांनी कारवर हल्ला केला. परंतु अशा हल्ल्यामुळे मी मागे सरणार नाही. माझा भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. Today ShivSena Activists attacked on Car of Bjp leader kirit somyya at Washim.

    शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आज पाहणी करण्याकरिता स्वत: किरीट सोमय्या या ठिकाणी येणार होते. या सर्वांची खबर शिवसैनिकांना लागली आणि सकाळपासून शिवसैनिक दबा धरून बसले होते. यादरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.



    किरीट सोमय्या यांचा ताफा वाशिममध्ये दाखल झाला. तेव्हा शिवसैनिकांनी आणि भावना गवळी यांच्या समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांच्या ताफ्यावर शाई आणि दगडफेक केली. या घटनेमुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

    भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले, ‘किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या ताफ्यांवरीला हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. किरीट सोमय्या हे माजी मंत्रीआहेत आणि त्यांच्यावर हल्ला होणे म्हणजे निंदनीय बाब आहे. ते माजी खासदार आहेत.

    त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा पुकारला आहे. त्यामध्ये सर्व महाराष्ट्र जनता त्यांच्या सोबत आहे. मी एक निवेदन करू इच्छितो की जर, त्यांच्या विरोधात कोणाची तक्रार असेल तर त्यांनी करावी. मात्र किरीट सोमय्या हे कागदपत्रांच्या आधारावर समोरील व्यक्तीवरती सर्व आरोप करत असतात तर समोरच्यांना वाटते की किरीट सोमय्या हे चुकीचे आहेत तर त्यांनी न्यायालयीन लढाई लढावी. असे गाडीवर हल्ले करू नये. त्याचा आम्ही निषेध करतो, असे मत व्यक्त केले आहे.

    आरोपी तसे सुटणार नाहीत: किरीट सोमय्या

    दरम्यान, किरीट सोमय्या म्हणाले, खासदार भावना गवळी,मिलिंद नार्वेकर, यशवंत जाधव, अआमदार यामिनी यशवंत जाधव, अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्याविरोधात येत्या काही दिवसात निश्चितच कारवाई होईल.

    Today ShivSena Activists attacked on Car of Bjp leader kirit somyya at Washim.

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!