• Download App
    दुपारच्या उन्हात महाराष्ट्र घरात झोपला, मतदानाचा टक्का घसरला; बारामतीत तर तो पुरता कोसळला!! today loksabha 2024 voting percentage after afternoon

    दुपारच्या उन्हात महाराष्ट्र घरात झोपला, मतदानाचा टक्का घसरला; बारामतीत तर तो पुरता कोसळला!!

    प्रतिनिधी

    मुंबई : संपूर्ण देशात उन्हाच्या चटक्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या हिरीरीने मतदान होत असताना दुपारच्या उन्हात महाराष्ट्र झोपला. त्यामुळे मतदानाचा टक्का “विक्रमी” घसरला. दुपारी 3.00 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 42.63 % मतदानाची नोंद झाली. यातले सगळ्यात कमी मतदान पवार काका – पुतण्यांच्या अतिप्रतिष्ठेच्या बारामती लोकसभा मतदारसंघात झाले. बारामतीमध्ये फक्त 34.96 % मतदानाची नोंद झाली, तर सर्वाधिक 51.51% मतदान हे कोल्हापुरात झाले. today loksabha 2024 voting percentage after afternoon

    * लातूर – 44.48 %
    * सांगली – 41.30 %
    * बारामती – 34.96 %
    * हातकणंगले – 49.94 %
    * कोल्हापूर – 51.51 %
    * माढा – 39.11 %
    * धाराशीव – 40.92 %
    * रायगड – 41.43 %
    * रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 44.73 %
    * सातारा 43.83 %
    * सोलापूर – 39.54 %

    देशातील दुपारी 3.00 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली. महाराष्ट्रात सर्वांत कमी 42.63% मतदानाची नोंद झाली, तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 63.11% मतदानाची नोंद झाली. आसाममध्ये देखील 63.08 % मतदान झाले.

    * आसाम 63.08 %
    * बिहार – 46.69 %
    * छत्तीसगड – 58.19 %
    * दादरा नगर हवेली आणि दमण दीव – 52.43 %
    * गोवा – 61.39 %
    * गुजरात – 47.03 %
    * कर्नाटक – 54.20 %
    * मध्य प्रदेश – 54.09 %
    * महाराष्ट्र – 42.63 %
    * उत्तर प्रदेश – 46.78 %
    * पश्चिम बंगाल – 63.11 %

    today loksabha 2024 voting percentage after afternoon

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shaktipitha Highway : रक्त सांडू, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही!; कोल्हापुरात विराट एल्गार, हजारो शेतकरी-महिलांचा सरकारविरोधात मोर्चा

    BJP Navnath Ban : केदारनाथ नको, औरंगजेबाच्या कबरीवर जा!:संजय राऊतांवर भाजपची सडकून टीका

    Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची पत्रकार परिषद; इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवरही टीका