विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मंगळवारी राज्यामध्ये एकूण 2172 नवीन कोरोणा बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1098 रुग्ण कोरोणा मुक्तदेखील झालेले आहेत.
Today 2172 new corona cases have been reported in the maharashtra state
देशातील सर्वात जास्त ओमायक्रॉन बाधित रुग्णदेखील महाराष्ट्रामध्येच आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 4 हजार 831 पेशन्टनी कोरोणावर मात केलेली आहे. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्त्याण्णव 97.65 टक्के इतके आहे. राज्यात आज एकही ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे.
राज्यात नोंद झालेल्या एकूण 167 ओमायक्रॉन बाधितांच्या रुग्णांपैकी 91 रुग्ण ओमायक्रॉन मुक्त झालेले आहेत.
राज्यात सध्या एकूण 1 लाख 11 हजार 232 व्यक्ती होम क्वारंटाइन मध्ये आहेत. तर 910 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये आहेत. आज एकूण 21 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोणाच्या एकूण 6358 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. तर एकूण 293 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशात ओमायक्रॉनचे एकूण 653 रुग्ण आढळले आहेत.
Today 2172 new corona cases have been reported in the maharashtra state
महत्त्वाच्या बातम्या
- UNSC : 2022-भारत भूषवणार UNSC दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद; दुसऱ्यांदा जबाबदारी
- लाईफ स्किल्स : सध्याच्या स्पर्धेत स्वतःच्या व्यक्तीमत्वाला द्या असा आकार
- मनी मॅटर्स : आर्थिक फसवणुकीला तसेच सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका
- शिवसेना- राष्ट्रवादीमधील संघर्ष झाला हिंसक, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांच्या वाहनावर हल्ला
- मेंदूचा शोध व बोध : मानवाच्या मेंदूचे वजन नेमके असते तरी किती