जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने (सक्तवसुली संचनालाय) कारवाई सुरू केल्यानं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय शशिकांत शिंदे त्यांना त्यांना वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. To save Ajit Pawar now Shashikant Shinde talking about interest of the farmers
विशेष प्रतिनिधी
सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने (सक्तवसुली संचनालाय) कारवाई सुरू केल्यानं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय शशिकांत शिंदे त्यांना त्यांना वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शेतकरी हिताचा पुळका दाखवत कारखाना वाचवण्याची मागणी करत आहे आहेत.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी डॉ. शालिनीताई पाटील यांनी कोरेगावसह खटाव तालुक्यात गावोगावी जाऊन भाग-भांडवल उभारत चिमणगावच्या माळावर साखर कारखाना उभा केला होता. मात्र, राज्यातील सत्ताधारी असेल्या पवार घराण्याने त्यांना प्रत्येक वेळी विरोध केला. कारखान्याच्या मंजुरीपासून लिलाव प्रक्रियेपर्यंत त्यांना प्रत्येक वेळी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. अजित पवार यांच्याच ताब्यात असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना उभारणीस कर्ज दिले नाही. त्यामुळे शालिनीताई यांनी राज्यातील इतर बँकांकडून कर्ज घेत कारखान्याची उभारणी केली.
मात्र पहिल्याच गळीत हंगामापासून कारखाना विविध कारणांनी अडचणीत येत गेला. कारखान्यातील कामगारांनी संघटना स्थापन केली, रायगड जिल्ह्यातील एका कामगार नेत्याने कारखान्यासाठी आंदोलन उभे केले. आर्थिक आरिष्टात सापडल्यानंतर कारखाना चालवणे अवघड झाल्याने कारखाना भाडेतत्वावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील मोठे साखर उद्योजक झुनझुनवाला यांनी काही काळ कारखाना चालविला, मात्र त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर सहकारातील सर्वात मोठ्या वारणा समुहाने काही काळ कारखाना चालविला, मात्र संचालक मंडळासह कामगारांच्या कुरबुरीमुळे त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.
त्यांच्यानंतर सिध्दार्थ समुहाने काही काळ कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते देखील मधूनच व्यवस्थापन सोडून निघून गेले. अखेरीस राज्य सहकारी बँकेने थकीत कजार्पोटी कारखान्याचा लिलाव केला. या लिलाव प्रक्रियेमध्ये भुईंजच्या किसनवीर साखर कारखान्याने सुरुवातीला भाग घेतला, मात्र त्यांनी ऐनवेळीस माघार घेतली. त्यानंतर मुंबईस्थित गुरु कमोडिटीज कंपनीने कारखाना लिलावात विकत घेतला. गुरु कमोडिटीज कंपनीने कारखान्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. त्यांनी राज्यातील विविध सहकारी बँकांकडून कर्जे घेतली. साखर कारखान्याचा लिलाव झाल्यानंतर अजित पवार यांचे मावस भाऊ राजेंद्रकुमार घाडगे यांच्या कंपनीने हा कारखाना विकत घेतला. त्यामुळे हा लिलाव हेतूपुरस्सर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटीहून कमी होती त्या कंपनीने 60 कोटींपेक्षा जास्त किंमत असलेला कारखाना कसा विकत घेतला? हा प्रश्न निर्माण झाला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. आता याच गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करून जप्तीची कारवाई केली आहे.
सहकारी साखर कारखाना खासगी करण्यात आला. मात्र आता शेतकऱ्यांच्या हिताचा पुळका आल्याचे दाखविले जात आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना सुरुच राहिला पाहिजे, ईडीने जर राजकीय खेळातून जरंडेश्वर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास, ईडीला सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांची ताकद निश्चितपणे दाखवून देऊ, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना हा शेतकरी हिताचा निर्णय घेणारा जिल्ह्यातील एकमेव कारखाना ठरला आहे. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या या कारखान्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने ईडीमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कारखाना चालू राहिला तर, ५० हजार ऊस उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळणार आहे, जर कारखाना बंद पाडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शेतकरी शांत बसणार नाहीत. जरंडेश्वर साखर कारखाना हा जरी डॉ. शालिनीताई पाटील यांनी काढला होता, हे मान्य असले तरी त्यांना तो चालविता आला नाही, हे कटू सत्य आहे. २०१० सालापर्यंत २५०० मेट्रिक टन क्षमतेचा हा कारखाना होता, आज हा कारखाना १० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त क्षमतेने चालत असून, वीज निर्मितीसह डिस्टलरीची उभारणी केली आहे.
आज कारखान्याच्या माध्यमातून हजारो रोजगार तयार झाले असून, ५० हजारांपेक्षा जास्त शेतकर्यांना त्याचा लाभ होत आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उच्चांकी दर देणारा आणि वेळेवर पेमेंट करणारा हा कारखाना असल्याने शेतकरी त्यालाच ऊस घालत आहेत. केवळ ‘कोरेगाव-खटाव’ तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून बरेच शेतकरी जरंडेश्वर कारखान्यावर अवलंबून आहेत, यापुढे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विचारात घेऊन गावनिहाय मोहीम हाती घेतली जाणार आहे. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्ते घरोघरी जाऊन आपले विचार मांडतात, त्याच धर्तीवर कारखाना कसा होता आणि आता काय परिस्थिती आहे, हे शेतकर्यांना पटवून दिले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये गावनिहाय बैठकांचे नियोजन केले जाणार आहे,असे शिंदे यांनी सांगितले.
To save Ajit Pawar now Shashikant Shinde talking about interest of the farmers
महत्त्वाच्या बातम्या
- भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित
- Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!
- समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?
- लसीकरण झालेले नाही, तिसरी लाट तोंडावर; शाळा सुरू करण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिकूल