• Download App
    डोंबवलीचा विकास करण्याची शिवसेनेला सुवर्णसंधी : दरेकर। To develop Dombavli Golden opportunity for Shiv Sena: Darekar

    डोंबवलीचा विकास करण्याची शिवसेनेला सुवर्णसंधी – दरेकर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आज डोंबिवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी कल्याण डोंबिवलीमधील रखडलेला प्रकल्पाबाबत शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना दरेकर यांनी युतीच सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीत  स्वतः लक्ष घालत होते. To develop Dombavli Golden opportunity for Shiv Sena: Darekar

    त्यानंतर शहरात विकासाची गती मंदावल , आता सारखी सुवर्णसंधी कधीच नाही, कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता शिवसेनेची असून खासदार, पालकमंत्री, नगरविकासमंत्री ,रस्ते खाते  शिवसेनेचे आहेत. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे आहेत. त्यामुळे विकास आता जर झाला नाही तर कधी करणार ? ज्या डोंबिवलीकरांनी तुम्हाला भरभरुन दिलं त्यांची सेवा कधी करणार , विकास कामात आम्ही राजकारण करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

    नितेश राणे यांनी केलेल्या विधानाबाबत दरेकर यांनी राजकारण, पक्ष लोकांच्या विकासासाठी असतात, लोकांच्या विकासासाठी विविध पक्ष विचार धारा एकत्र येऊन जनतेचा विकास होणार असेल तर आमचा अहंकारापेक्षा लोकांचं हित व विकास  महत्वाचं आहे, असे त्यांनी सांगितले.

    • कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता
    • डोंबवलीच्या विकासाची शिवसेनेला सुवर्णसंधी
    • रखडलेला प्रकल्पाबाबत शिवसेनेवर सडकून टीका
    • विकास आता नाही तर कधी करणार ?
    • डोंबिवलीकरांनी तुम्हाला भरभरुन दिलं
    • आता विकासाच्या रूपाने परतफेड करण्याची वेळ
    • देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामाकडे लक्ष दिले
    • विकासकामात सहकार्य करू, राजकारण नाही

    To develop Dombavli Golden opportunity for Shiv Sena: Darekar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ