• Download App
    सासरच्या जाचाला कंटाळून, कर्जबाजारी झालेल्या जावईबापूंची आत्महत्या; पुण्यातील घटना Tired of father-in-law's persecution, debt-ridden son-in-law commits suicide; Incidents in Pune

    सासरच्या जाचाला कंटाळून, कर्जबाजारी झालेल्या जावईबापूंची आत्महत्या; पुण्यातील घटना

    वृत्तसंस्था

    पुणे – सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची पहिलीच घटना असावी. त्यात ती सुसंकृत अशा पुण्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. Tired of father-in-law’s persecution, debt-ridden son-in-law commits suicide; Incidents in Pune

    पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर येथे सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते. त्यानंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये सासूरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिलं आहे.

    निखिलनं आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. आई तू काळजी करू नकोस मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे असे चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. निखिलचे एक वर्षापूर्वी लग्नं झालं होतं.



    तर दुसरीकडे निखिल मानसिक तणावात असल्यानं त्याने हे पाऊलं उचलल्याचे मित्र सांगत आहेत. त्याच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी शौचालय स्वच्छ करण्याचे औषध पिल्याचे समोर आलं आहे. त्यात तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार केले गेले असून ती गर्भवती देखील आहे. त्याचीही पोलिसांकडे नोंद झाली असून निखिलच्या आत्महत्येची नोंद केली जात असून चतुशृंगी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
    दरम्यान पोलीस तपासात काय ते समोर येईलच.

    Tired of father-in-law’s persecution, debt-ridden son-in-law commits suicide; Incidents in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!