प्रतिनिधी
रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेचा रत्नागिरीतला दुसरा टप्पा लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून सुरू केला. Tilak in Ratnagiri – Narayan Rane’s blessings by saluting Savarkar’s memory
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे” असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरीतील जन्मस्थानी भेट देत जन आशीर्वाद यात्रेच्या कोकण दौऱ्यादरम्यान टिळकांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.
तसेच त्यांनी रत्नागिरीच्या सावरकर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण केला. प्रचंड बुद्धिमत्ता, तर्कबुद्धिवादी आणि शौर्याचे मूर्तिमंत उदाहरण, बॅरिस्टर, लेखक, कवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत जन आशीर्वाद यात्रेच्या कोकण दौऱ्यादरम्यान रत्नागिरी येथे पावन स्मृतीस अभिवादन केले, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
याआधी पहिल्या टप्प्यात नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नाहगिरीतून पुन्हा नव्या उत्साहात सुरू केली. त्यांनी स्वतः ट्विट करून ही या यात्रेतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीत जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी ग्वाही दिली.