वृत्तसंस्था
पुणे : वाघ, बिबट्या कातडीची पुणे जिल्ह्यात तस्करी सुरु आहे. वन विभागाने वाघ, बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.Tiger, leopard skinned Smuggling in Pune district; 8 persons Arrested
पुणे जिल्ह्यात जंगलाच प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अनेकदा वाघ, बिबट्या, रानगवे मानवी वस्तीत शिरत असल्याचे पहायला मिळते. मात्र,आता वाघ आणि बिबट्याचे जगणे शिकाऱ्यामुळे अवघड झाले आहे.
वन विभाग पुणे जिल्हा यांनी नुकतीच दोन बिबट्याचे तर एक वाघाचे कातडे जप्त केले आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांची हत्या केली जात असल्याचे उघड झाले आहे. आठ तस्करांना ताब्यात घेतले आहे.
वारजे येथे वाघाचे कातडे घेऊन येणाऱ्याला सापळा रचून वन विभागने ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी सासवडल बिबट्याच्या दोन कातडीसोबत दोन चारचाकी आणि एक दुचाकी सुद्धा जप्त केली आहे.
एकंदरीत पुणे जिल्ह्यात वन्य प्राण्यांची हत्या करून त्यांच्या कातडीच्या तस्करी सुरु आहे. वाघ हा राष्ट्रीय प्राणी तर बिबट्या हा पुणे जिल्ह्याचा एक वन्य प्राणी आहे. तो मानवाच्या सहवासात वाढत असून त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे.
राजकीय उखाळ्या- पाखाळ्याना ऊत
राजकीय मंडळी एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात मग्न असून जनता त्यांचे मनोरंजनाचे खेळ आवडीने पाहत आहे. दुसरीकडे वन्यप्राणी हे शिकारी आणि तस्करांचे शिकार होत आहेत. पर्यायाने हे दुर्मीळ प्राणी नामशेष होण्याचा धोका वाढला आहे.
- वाघ, बिबट्या कातडीची पुणे जिल्ह्यात तस्करी
- कातडीची तस्करी करणाऱ्या आठ जण ताब्यात
- वारजे- सासवड येथे सापळा रचून घेतले ताब्यात
- दोन बिबट्याचे तर एक वाघाचे कातडे जप्त
- वाघ राष्ट्रीय प्राणी तर बिबट्या हा पुणे जिल्ह्याचा
- दुर्मीळ वन्यप्राणी नामशेष होण्याचा धोका वाढला