• Download App
    अधिकाऱ्यावर माईक आणि पाण्याची बाटली फेकणे महागात, आ. देवेंद्र भुयार यांना 15 हजार रुपये दंडासह 3 महिने तुरुंगावासाची शिक्षा|Throwing a mic and a water bottle at an officer is expensive. Devendra Bhuyar sentenced to 3 months imprisonment with a fine of Rs 15,000

    अधिकाऱ्यावर माईक आणि पाण्याची बाटली फेकणे महागात, आ. देवेंद्र भुयार यांना 15 हजार रुपये दंडासह 3 महिने तुरुंगावासाची शिक्षा

    प्रतिनिधी

    अमरावती : जिल्ह्यातील वरूड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्याविरोधात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवाय 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 3 वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्यावर पाण्याची बाटली आणि माईक फेकल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.Throwing a mic and a water bottle at an officer is expensive. Devendra Bhuyar sentenced to 3 months imprisonment with a fine of Rs 15,000

    2019 मध्ये पाणीटंचाईच्या मुद्द्यावर आयोजित कार्यक्रमादरम्यान देवेंद्र भुयार यांनी अधिकारी सुभाष बोपटे यांच्यावर माईक आणि पाण्याची बाटली फेकली. त्यावेळी परिषदेच्या तत्कालीन सीईओ मनीषा खत्री यांनी भुयार यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी शासकीय कामात अडथळा आणण्याचे काम आमदाराने केल्याचा आरोप करण्यात आला.



    अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आमदाराविरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तपासादरम्यान सापडलेले सर्व पुरावे समोर ठेवण्यात आले.

    या प्रकरणात सातही साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष दिल्याने आमदारांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आमदारांनी अधिकाऱ्यावर पाण्याची बाटली आणि माईक फेकण्यात आल्याचे सर्वांनी एकमुखाने सांगितले. अशा स्थितीत सर्व पुरावे व साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्यांना 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

    Throwing a mic and a water bottle at an officer is expensive. Devendra Bhuyar sentenced to 3 months imprisonment with a fine of Rs 15,000

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या माढा मोहिमेनंतर फडणवीसांची स्वारी; फेरमांडणी करून “मोदी है तो मुमकिन है” ची कसून पूर्वतयारी!!

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता