हवालाचे पाच कोटी रुपये नाशिक येथून मुंबईला घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकाला पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याचे तीन पोलिसांनी भिवंडीत जाऊन ४५ लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
प्रतिनिधी
पुणे –भिवंडी येथे व्यापार्याला अडवून कारवाईची भीती दाखवत 45 लाख रुपये उकळणार्या दत्तवाडी पोलिस ठाण्यातील तिन पोलिसांना शनिवारी मध्यरात्री पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांना भिवंडी न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.Three Pune police constable stolen ४५ lakhs in Bhiwandi
गणेश बाळासाहेब शिंदे (वय 35), गणेश मारुती कांबळे (वय 34) आणि दिलीप मारोती पिलाने (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात बाबूभाई राजाराम सोलंकी (वय 47) हा अटक आहे. याबाबत रामलाल मोतीलाल परमार (वय 45, रा. संभाजीनगर) यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
8 तारखेला दत्तवाडी पोलीस ठाण्यातील शिंदे, कांबळे आणि पिलाने यांनी सोलंकी याच्या मदतीने भिवंडी येथे जाऊन परमार यांना लुटल्याची घटना घडली होती. परमार यांच्या कारमध्ये पाच कोटी रुपये होते. त्यांना कारवाईची भिती दाखवून त्यातील 45 लाख रुपये घेऊन तिघेही पसार झाले होते.
याप्रकरणात ठाणे पोलिसांनी सोलंकीला अटक केली. मात्र, पोलीस कर्मचारी फरार झाले होते. तेव्हापासून नारपोली पोलीस ठाण्याचे पथक या तिघांच्या मागावर होते. तिघांना रात्री उशीरा पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एम. बल्लाळ यांनी दिली.
Three Pune police constable stolen ४५ lakhs in Bhiwandi
महत्त्वाच्या बातम्या
- The Kashmir Files : “विशिष्ट” थेटरात खुर्च्या रिकाम्या तरी “हाऊस फुल्ल”चे बोर्ड; सिनेमा उतरवायचे मनसूबे; मोठे षडयंत्र की…??
- भाजपकडे अद्याप राष्ट्रपती निवडणुकीसाठी पुरेशी मते नाहीत
- पुणे पालिका निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीनेच : अजित पवार
- Fadnavis – Nawab Malik : बदल्या घोटाळ्यातील डॉक्युमेंट्स नवाब मलिकांनीच पत्रकारांना दिली; त्यांची चौकशी करा!! – देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत मागणी