प्रतिनिधी
संभाजीनगर : ठाकरेंशी युती राष्ट्रवादीशी फटकून; तरी आंबेडकरांना काँग्रेस ठेवतेय दूर!!, अशी आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती आहे. राष्ट्रवादीशी ते फटकून वागत आहेत पण तरी देखील काँग्रेस नेते प्रकाश आंबेडकर यांना जवळ करायला तयार नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची आजच्या पत्रकार परिषदेत चिडचिड झालेली दिसली. Though Prakash ambedkar has alliance with uddhav thackeray, Congress kept him away from INDI alliance
प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत जायचे आहे त्याआधी महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचे प्रवेश करायचा आहे पण उद्धव ठाकरे स्वतः बाकी कोणतेच पक्ष त्यांना विचारात घेत नाही त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व 48 जागा लढविण्याची तयारी चालवली आहे तशी त्यांनी पत्रकार परिषदेत घोषणा देखील केली तरी देखील काँग्रेसचे नेते मात्र त्यांना प्रतिसाद द्यायला तयार नाहीत.
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना खरमरीत पत्र लिहून त्याबाबतचा जाबही विचारला आहे. पण मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्या पत्राला अजून उत्तर दिलेले नाही. आज पुन्हा एकदा आंबेडकर यांनी काँग्रेसला डिवचले आहे, तर दिवाळीनंतर मणिपूर आणि गोध्रा सारखं कांड होण्याची शक्यताही आंबेडकर यांनी वर्तवली आहे. ठाकरे गटही अनेकदा अशीच भाषा वापरताना दिसला आहे.
आम्हाला आघाडीत का घेत नाही??, हे तुम्ही मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारा. आम्हाला विचारायची गरज नाही. आम्ही तर आघाडीचा प्रस्ताव कधीच दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आमची युती आहे. तरीही ते आम्हाला आघाडीत का घेत नाहीत हे त्यांनीच सांगावे. जबरदस्तीने कधी लग्न होत नाही. जबरदस्तीने लग्न केलं तर टिकते का??, असा सवालच प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आजवरच्या मुख्यमंत्र्यांना विचारा
मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या दाराशी आला म्हणून तो प्रांतवाद झाला. मी कुठलाही प्रांतवाद आणि जातीयवादाला थारा देत नाही. आम्ही प्रबोधन करत आहोत. मुंबईत मराठी माणसाची संख्या का घटली?? हे आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांना विचारा. मराठी माणूस मुंबईत थांबण्यासाठी त्या सर्वांनी काय केले? हे सुद्धा आजवरच्या सर्व मुख्यमंत्र्यांना विचारा, असं सांगतानाच मराठी हौसिंग सोसायट्या बनवून मराठी माणसांची संख्या वाढवायला हवी, असा उपायही त्यांनी सांगितला.
सत्ता द्या, मार्ग काढतो
आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. सध्या लुटारूंचं राज्य सुरू आहे. भाजपने लुटायला सुरुवात केली. ही गँग लुटारूंची आहे
सर्वोच्च न्यायालय बसले आहे. ते आरक्षण देणार नाही. आंदोलनाचे फलित होणार नाही. मुख्यमंत्री गावातल्या टग्या सारखे करत असून आरक्षण द्या असे मागत आहे. ओबीसींचे 27 % आरक्षण इतर वर्गाला संतुष्ट ठेवू शकते. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता तोडगा काढता येतो. मला सत्ता द्या मी मार्ग काढून दाखवतो, असं आव्हानच त्यांनी दिलं.
हिंदूंचे राज्य, हिंदूंवरच हल्ले
जैन समाजावर हल्ला होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांच्याकडे सर्व व्यवहार असल्याने त्यांना टार्गेट केले जाणार. जैन मुनी आणि साधूंवर धोका निर्माण झाला आहे. दिवाळीनंतर गोध्रा आणि मणिपूर सारखे कांड होण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. सनातन धर्माचे लोक अफवा पसरवत आहेत. हिंदूंचे राज्य असून हिंदूंवर हल्ला होत आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
Though Prakash ambedkar has alliance with uddhav thackeray, Congress kept him away from INDI alliance
महत्वाच्या बातम्या
- कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा तापला, आज शेतकऱ्यांची कर्नाटक बंदची हाक; 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी संघटनांचा पाठिंबा
- Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक सुवर्ण, पुरुष संघाने केला विश्वविक्रम
- इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 : भारतीय लोकसंख्येची झपाट्याने वृद्धत्वाकडे वाटचाल, शतकाअखेरीस 36 टक्के राहील प्रमाण