विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुतण्याकडून काकांची धुलाई, तरीही बहिणीची भावाबाबत नरमाई!!, असे म्हणायची वेळ राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांच्या वक्तव्यांमधून आली आहे.Though ajit pawar strongly targets sharad pawar, supriya sule has not daring to take on ajit pawar!!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालगीत ठाण्यात घेतलेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर तिखट शब्दांमध्ये टीका केली. काही लोक वयाची 80 वर्षे उलटून गेली तरी, हट्टीपणा चालूच ठेवतात. ते निवृत्त होतच नाहीत. राज्य सरकारमधून 58 वर्षांचे कर्मचारी निवृत्त होतात, कोणी 60 वर्षांनंतर निवृत्त होतात, कोणी 65 वर्षानंतर निवृत्त होतात, कोणी 75 नंतर निवृत्त होतात, पण आता यांचे वय 84 झाले तरी निवृत्त होऊन घरी बसायला तयार नाहीत आणि सल्लागाराची भूमिका घेत नाहीत, असे परखड टीकास्त्र अजित पवारांनी सोडले.
त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखंड काम करण्याच्या ऊर्जेची स्तुती केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळेच संपूर्ण जगात भारताचे मान उंचावली आहे. वेगवेगळ्या मोहिमांद्वारे भारत पुढे जातो आहे, असे अजित दादा म्हणाले.
परंतु पुतण्या कडून काकांची एवढी मोठ्या प्रमाणावर धुलाई होऊन देखील बहीण सुप्रिया सुळे मात्र अजितदादा बाबत नरमाईचीच भूमिका घेताना दिसल्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोले हाणले, पण अजितदादांची मात्र स्तुती केली अजित पवारांना सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय आहे. त्याचीच कॉपी मुख्यमंत्री सध्या करत आहेत, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला. अजित पवारांच्या एका कार्यक्रमात भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरून त्यांनी अजित पवारांना नाही, तर देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. त्यातूनच सुप्रिया सुळे यांनी आजही अजितदादांबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचेच दिसून आले.
वास्तविक शिर्डीत राष्ट्रवादीच्या शिबिरात पत्रकार संजय आवटे यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून आपला दादा – आपला दादा असे सारखे करू नका. त्यांच्याविरुद्ध ठाम भूमिका घ्या. तशी ठाम भूमिका घेतल्याशिवाय कार्यकर्त्यांना तुम्ही खरे आहात हे पटणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला होता. परंतु त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांबाबत नरमाईचीच भूमिका दाखवली.
पण अजित पवारांना शिंगावर घेण्याची हिंमत आजही सुप्रिया सुळे दाखवू शकत नाहीत. कारण बारामती लोकसभा मतदारसंघ त्यांना पुन्हा खासदार व्हायचे आहे. अजित पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रभाव आणि दादागिरी याची पक्की जाणीव सुप्रिया सुळे यांना आहे. त्यामुळेच त्यांनी त्या अजित पवारांनी विरुद्ध उघडपणे भूमिका घेण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत.
सुप्रिया सुळे थोपटेंच्या घरी
परवाच त्यांनी पवारांचे जुने राजकीय वैरी असलेल्या अनंतराव थोपटे आणि संग्राम थोपटे यांची भोरमधल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी लोकसभा निवडणूक विषयी चर्चा केली. याचा अर्थ सुप्रिया सुळे यांना अजित पवार विरुद्ध पंगा घेताना 10 वेळा विचार करावा लागतो आहे आणि अजित पवारांशी त्या थेटपणे पंगा घेऊ शकत नाहीत. तो घ्यायचा असेल, तर त्यांना पवारांच्या जुन्या राजकीय क्षेत्राचे उंबरे झिजवावे लागतात हे भोर मधल्या थोपटे कुटुंबीयांच्या भेटीवरून स्पष्ट झाले.
Though ajit pawar strongly targets sharad pawar, supriya sule has not daring to take on ajit pawar!!
महत्वाच्या बातम्या
- एआययूडीएफ प्रमुखांचा मुस्लिमांना 20 ते 26 जानेवारीपर्यंत प्रवास न करण्याचा सल्ला, भाजपचा पलटवार- अजमल-ओवैसींनी द्वेष पसरवला
- सदोष औषधे परत मागवल्याबद्दल ड्रग्ज अथॉरिटीला माहिती द्यावी लागेल; सरकारची कंपन्यांना सूचना- WHO स्टँडर्डनुसार टेस्ट करा
- खोटं बोलून, युती तोडून उद्धव ठाकरे टुणकन मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर; मुख्यमंत्री शिंदे “मिशन 48” मोहिमेवर!!
- गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, आता राहण्यायोग्य नाही