• Download App
    ‘’गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता त्यांची आठवण झाली’’Those who stabbed Gopinath Munde in the back remembered him now Atul Bhatkhalkars criticism of Dhananjay Munde

    ”गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता त्यांची आठवण झाली”

    (संग्रहित छायाचित्र)

    गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता त्यांची आठवण झाली.

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात आज विधीमंडळात जोरदार शा‍ब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली. यंदाच्या अर्थसंकल्पात भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा सरकारला विसर पडला, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं. यावर प्रत्युत्तर देताना अतुल भातखळकरांनी, गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता त्यांची आठवण झाली, असं म्हणत टोला लगावला. Those who stabbed Gopinath Munde in the back remembered him now Atul Bhatkhalkars criticism of Dhananjay Munde

    धनंजय मुंडेंच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना अतुल भातखळकर म्हणाले, ‘’गोपीनाथ मुंडेंचा विसर या सरकारला अर्थसंकल्पाच्या निमित्ताने पडलाय हे ते सांगत आहेत. मला ऐकूण आश्चर्य वाटत होतं. ज्यांनी जिवंतपणी विधानपरिषदेचं तिकीट मिळाल्यानंतर साहेबांच्या पाठीत खंजीर खूपसण्याचं काम केलं आणि त्यांना मनस्ताप दिला. त्यांना आज स्व. गोपीनाथ मुंडेंच्या विषयी प्रेमाचे उमाळे येत आहेत. याला पुतणामावशीचं प्रेम म्हणतात अन्य काही नाही.’’


    मुख्यमंत्री योगींचे कौतुक करताना नितीन गडकीरींनी भगवान श्रीकृष्णाचं दिलं उदाहरण, म्हणाले…


    तर ‘’अतुल भातखळकरांन माझा राजकीय प्रवास माहीत आहे. मी स्व. गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या, स्वं. पंडीतअण्णांचा चिरंजीव आहे. मी पाठीत खंजीर खूपसला नाही. ११ जानेवारी २०१२ रोजी मला, माझ्या वडिलांना पक्षातून काढायची आणि रक्ताचं नातं तोडण्याची घोषणा झाली. पाठीत खंजीर खूपसला असा माझ्यावर आरोप केला जातोय. पण मुंडें साहेबांच्या पाठीत कोणी, कोणी खंजीर खूपसला? याचे सर्वजण साक्षीदार आहेत. दहा वर्षे त्याच संघर्षातून आलो आहे, त्यामुळे व्यक्तिगत आरोप करू नयेत.’’ असं धनंजय मुंडेंनी भातखळकरांच्या आरोपावर म्हटलं.

    यावर प्रत्युत्तर देतना अतुल भातखळकरींनी ‘’तुम्ही कितीही नाटकीपणाने बोललात तरी महाराष्ट्र फसणार नाही. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून तुम्हाला आमदार केलं. तरीही गोपीनाथ मुंडेंना मनस्ताप देण्याचं काम तुम्ही केलं, ही वस्तूस्थिती आहे.’’ असं म्हणत धनंजय मुंडेंवर पलटवार केला.

    Those who stabbed Gopinath Munde in the back remembered him now Atul Bhatkhalkars criticism of Dhananjay Munde

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!