- Gateway of India : ‘आझादी का अमृत मोहत्सव’ अंतर्गत ‘गेट वे ऑफ इंडिया’वर आकर्षक ‘लाइट ॲण्ड साऊंड शो’ सुरू झाला.
विशेष प्रतिनिधी
मुंबईतील ऐतिहासिक ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘आझादी का अमृत मोहत्सव’ व इंग्रजांच्या सैन्याला भारत सोडून ७५ वर्षे झाल्यानिमित्त काल(२८ फेब्रवारी) पर्यटन विभागाच्यावतीने आकर्षक ‘लाइट ॲण्ड साऊंड’शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. Those who do not know their history they have present but no future Devendra Fadnavis
हा ‘लाइट ॲण्ड साऊंड शो’ सुरुवातीस आठवड्यातून दोन वेळेस म्हणजे शनिवार व रविवारी असणार आहे. स्वातंत्र्य युद्धातील महाराष्ट्राचे योगदान यावरही याद्वारे प्रकाश टाकला जाणार आहे.आझादी का अमृत महोत्सव आणि प्रगतीशील भारत अशी संकल्पना असणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा दिवस ७५ वर्षे पूर्ण करतो ज्या दिवशी इंग्रजांची शेवटची तुकडी भारत सोडून बाहेर गेली. गेट वे ऑफ इंडिया एक अशी जागा आहे की मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी येण्याची इच्छा होते.जरी जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठी हे द्वार तयार केलं होतं, तरी देखील आज मुंबईच्या एकुणच सौंदर्यात याचा समावेश होतो. लोक मोठ्याप्रमाणात पाहण्यासाठी येतात. केवळपाहून लोकांनी परत जाण्यापेक्षा थोडा इतिहास जर त्यांच्यासमोर आला, तर त्यामधून खऱ्या अर्थाने त्यांचं प्रबोधनही करू शकू.
याचबरोबर जसंजसे स्वातंत्र्याचे वर्ष वाढत जातात तसा लोकांचा दृष्टिकोनही बदलतो. अनेक वर्ष एतिहासिक घटना समाज विसरत जातो, म्हणूच पंतप्रधान मोदींनी अमृतमोहत्सवी वर्षात आपल्या देशाच्या स्वातंत्र्य युद्धातील जेवढे अनाम सैनिक आहेत, अनाम हिरो आहेत. त्या सगळ्यांची आठवण रहावी व त्यांचा लढा समाजापर्यंत पोहचावा यासाठी उपक्रम हाती घेतला. असंही फडणवीसांनी सांगितलं.
याशिवाय, इतिहास आपल्याला पुढील पिढीपर्यंत नेलाच पाहिजे. असं म्हणतात ज्यांना आपला इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान तर असतं परंतु भविष्य नसतं. म्हणून आपला इतिहास समजापर्यंत पोहचवण्याचं काम अशा प्रकारच्या विविध उपक्रमांच्या माध्यामातून आपण करतो आहोत. असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
Those who do not know their history they have present but no future Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या