वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२२ चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत ३ मार्च रोजी सुरु होणार असून २५ मार्च पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. This year’s budget session will be held in Mumbai from March 3 to 25
राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर होणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.
This year’s budget session will be held in Mumbai from March 3 to 25
महत्त्वाच्या बातम्या
- मला जोड्याने मारणार म्हणता, 19 बंगल्यांचा मालमत्ता कर “कोणी” भरला? त्यांना काय करणार?? किरीट सोमय्यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर!!
- अक्षयकुमार गँगस्टरच्या भूमिकेत; बच्चन पांडे चित्रपटात भयानक लूकमध्ये दिसणार प्रेक्षकांना
- Towards a Resilient Planet : TERI जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्घाटनपर भाषण
- दिव्यांगत्वावर मात करून दोन मित्र आत्मनिर्भर : कुणापुढेही हात न पसरता थाटला व्यवसाय