विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2019 मध्ये साताऱ्यातल्या पावसात शरद पवार भिजले काय आणि त्यामुळे श्रीनिवास पाटलांचा “फ्लूक” विजय झाला काय… लोकांना वाटायला लागले पावसात भिजून भाषण केले की आपोआप आपला विजय होतो. त्यामुळे आधी राष्ट्रवादी काँग्रेसने पवारांच्या पावसात भिजण्याचे भांडवल केले होते, पण ते भांडवल फक्त साताऱ्या पुरतेच मर्यादित राहिले. त्याचा बाकीच्या मतदारसंघांमध्ये लाभ झाल्याचे उदाहरणे नाहीत, पण तरी देखील तो “शरद पवार पॅटर्न” आहे, असे म्हणून 2024 च्या निवडणुकीत पावसात भिजून भाषण करण्याची फॅशन बोकाळली आहे.This” means Sharad Pawar pattern; Standing in the rain to give a speech has come into fashion!!
प्रणिती शिंदे संजय जाधव आणि राजेश टोपे यांनी शरद पवार पॅटर्न राबवत पावसात भिजून भाषण केली. पण हा “अवकाळी” पाऊस आहे आणि अवकाळी पावसाने पिके तरारण्यापेक्षा पिकांचे नुकसान होते, हे या नेत्यांनी लक्षात घेतलेले दिसले नाही. त्यामुळे पावसात भिजण्याचा पवारांना एकदा फायदा झाला, पण 2024 च्या निवडणुकीत मात्र तशाच पावसात भिजण्याचा कितपत फायदा होणार आहे, हे येणारा काळच सांगेल.
प्रणिती शिंदेंची पावसात कॉर्नर सभा
सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ठाकरे गटाने कॉर्नर सभा आयोजित केली होती. त्या सभेत प्रणिती शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच अचानक पावसाला सुरुवात झाली. पण, प्रणिती शिंदे यांनी भाषण थांबवले नाही. त्यांनी पावसात उभे राहून भिजत भाषण केले.
संजय जाधव, राजेश टोपेंचे पावसात भाषण
परभणी लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथील तीर्थपुरीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राजेश टोपेंसह अनेक नेते अन कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र भाषण सुरु असतानाच पाऊस सुरु झाला, मग काय महाविकास आघडीचे उमेदवार संजय जाधव अन् राष्ट्रवादी शरद पवार यांचे नेते राजेश टोपेंनी यांनीही पावसात भिजून भाषण ठोकून घेतले.
This” means Sharad Pawar pattern; Standing in the rain to give a speech has come into fashion!!
महत्वाच्या बातम्या
- ताहाने रचला होता कट, तर शाजिबने पेरला IED, अखेर असे जेरबंद झाले बंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील आरोपी
- पंतप्रधान मोदी म्हणाले- ईडी प्रकरणांपैकी फक्त 3% प्रकरणे राजकीय नेत्यांशी संबंधित
- केंद्रीय माहिती आयोगाची निवडणूक आयोगाला नोटीस; EVM-VVPAT शी संबंधित RTIला प्रतिसाद दिला नाही
- मोदी म्हणाले, संविधान आमच्यासाठी कुराण, बायबल आणि गीता!!; या विधानाचा अर्थ समजतोय का??