विशेष प्रतिनिधी
मुबंई : महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय वातावरण तापले असतानाच एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. संपकरी आंदोलकांना आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. ‘कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून, त्यांच्या संसाराच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजून नका’ असा इशारा देखील त्यांनी विरोधकांना दिला आहे.
This is not the time for politics ; Chief Minister Uddhav Thackeray
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे, प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहे. त्यांच्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. पण विलीनीकरणाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मागण्या संदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी विशेष समिती नेमली जावी असे सूचित करण्यात आलेले आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताना म्हटले आहे की, ‘पुढील मागण्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी विशेष समिती लवकरच नेमून काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे एस टी कर्मचार्यांनो तुम्ही तुमचे आंदोलन मागे घ्यावे. तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाही. मागील बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा, यासाठी राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे. नुकताच आपण सर्वजण कोरोनाशी एक मोठी लढाई जिंकलो आहोत आणि ही लढाई अजूनही सुरूच आहे. अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका.’
विरोधकांना यावेळी निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणतात, विरोधी राजकीय पक्षाने देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांना संसाराच्या होळ्यांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजून नये. ही वेळ राजकारणाची नाही. असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी विरोधकांना उद्देशून म्हटले आहे.
This is not the time for politics ; Chief Minister Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल