विशेष प्रतिनिधी
मुबंई : सूक्ष्म, लघु उद्योगमंत्री नितेश राणे यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी त्याच संध्याकाळी या स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण केले होते.
This is an insult to all Hindus ; Minister for Micro, Small Industries Nitesh Rane
सध्या महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज एक मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्य मंत्री नवाब मलिक यांच्यासह उपमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे.
नवाब मलिक यांनी ड्रग प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठे आरोप केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मलिक यांच्यावर आरोप केले होते. या पाश्र्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, आपल्या सगळ्यांना चांगले माहीत आहे की 1993 च्या दंगलीमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळा साहेबांनी हिंदूंना वाचवलं होतं. मुंबईच्या हिंदूंना वाचवलं आणि त्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला. आज इतक्या वर्षांनंतर त्यांचाच मुलगा 1993 च्या दंगलीमधील जे मुख्य आरोपी आहेत, त्यांचा तो बिझनेस पार्टनर मंत्री आहे. त्यांच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसले आहेत. याचबरोबर मला वाटतं, आता खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडल्याचा वेळ आलेली आहे. हा समस्त हिंदूंचा अपमान आहे. म्हणून शिवसैनिक आता स्मृतीस्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडावे. नाही तर हे महान कार्य मीच करतो. असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये बोलून दाखवले आहे.
This is an insult to all Hindus ; Minister for Micro, Small Industries Nitesh Rane
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल