विशेष प्रतिनिधी
मुंबई : बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई अशी कविता करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अल्पंसख्यांक विभागाचे मंत्रीआणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नबाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.They have to save their son-in-law and black earnings, Poem by Amrita Fadnavis, aimed at Nabab Malik
मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून मलिक यांनी थेट भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अमृता फडणवीस यांनी ट्विट करून नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी हिंदीतून बिगडे नवाब असे म्हणत एक कविताच मलिक यांच्यावर केली. त्यांनी म्हटले आहे,
बिगड़े नवाब ने-प्रेस कॉन्फरन्स पर प्रेस कॉन्फरन्स, प्रेस कॉन्फरन्स पर प्रेस कॉन्फरन्स, प्रेस कॉन्फरन्स पर प्रेस कॉन्फरन्स बुलाई लेकिन हर बार झूठ और मक्कारी की ही बाते हमे सुनाई, लक्ष्य इनका एक ही है, मेरे भाई बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई.
नवाब मलिक हे रोज पत्रकार परिषदा घेत आहे. पण, ते सारखं खोट बोलत असून त्यांना फक्त आपल्या जावयाला वाचवायचं आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला.याआधीही जेव्हा मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. तेव्हा अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर हल्लाबोल केला होता.
माझ्यावर जाणिवपूर्वक आरोप केले जात आहे. आमच्याकडे ना जमिनी आहे, ना साखर कारखाने आहे, त्यामुळे असे आरोप केले जात आहे. बे नकाब नवाब होता हे ते जरूर होतील पण ही वेळेची गोष्ट आहे. काही सूचत नाही, माणसाच्या डोक्यात जेव्हा वाईट विचार येतात त्यामुळे ते असे आरोप करत आहेत.
आज ही लोक सामजिक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे लागले आहेत. तुम्हाला जे राजकारण करायचे असेल, बिगडे नबाव व्हायचे असेल तर तुम्ही तुमची प्रतिमा सुधारा नाहीतर महाराष्ट्राचं काही खरे नाही.देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा करत नवाब मलिक यांनी जयदीप राणाचा फोटो ट्विट केला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणे केले होते. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. नदी संरक्षणासाठीचं हे गाणं होतं. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसही आणि सुधीर मुनगंटीवार झळकले होते. याच गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
They have to save their son-in-law and black earnings, Poem by Amrita Fadnavis, aimed at Nabab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल