वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे असतील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. There will be heavy rain
गेल्या २४ तासांत सलग दुसऱ्या दिवशी सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली, तर औरंगाबाद, नगर जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण होते.एखादी सर पडली. दुपारी कडक ऊन, सायंकाळी मेघगर्जना, जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस असे वातावरण सध्या पुण्यासह विविध जिल्ह्यात झालेले आहे.
हवामानाचा अंदाज
मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा उत्तरअंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा या मार्गाने गेला आहे. परिणामी तेलंगणसह आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, केरळ, तमिळनाडूत पावसाळी वातावरण आहे.
महाराष्ट्रात इशारा…
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिळ्यात २८, २९ आणि ३० एप्रिल, तर रायगड जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २८, २९ आणि ३० एप्रिल या दोन दिवसांत वादळी वारे व मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद जिळ्यात तसेच विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २८, २९ आणि ३० एप्रिल या दोन्ही दिवशी जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
कोल्हापुर शहर जलमय ; आली पुराची आठवण
महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. पुण्यात दुपारनंतर हलक्या पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर शहरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस आला. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले. तासभर कोसळणाऱ्या पावसामुळे अवघे शहर जलमय झाले होते. त्यामुळे दोन वर्षापूर्वी आलेल्या पुराची आठवण झाल्याने कोल्हापूरकरांच्या अंगावर काटा आला.
There will be heavy rain
महत्त्वाच्या बातम्या
- देशात लशींचा खडखडाट, मर्यादित साठ्यांमुळे अनेक राज्यांसमोर आव्हानांचा डोंगर
- कोरोना लढ्यासाठी `गुगल`ची भारताला १३५ कोटींची मदत
- कोरोनाच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरु
- Maharashtra Lockdown : लॅाकडाऊन वाढणार का?; राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतील निर्णयाकडे जनतेचे लक्ष
- आमने-सामने : रेमडेसिविर वरून ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले खडे बोल तर फडणवीसांनी वस्तुस्थिती समोर ठेवत केला गैरसमज दुर