• Download App
    देशात लोकशाही चे वातावरण राहिले की नाही विचार होणे गरजेचे - आदित्य ठाकरे|There is need to thinking about democracy in india or not says environment minister Aditya Thakare

    देशात लोकशाही चे वातावरण राहिले की नाही विचार होणे गरजेचे – आदित्य ठाकरे

    केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाई राजकीय हेतूने हाेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामागे कुठेनाकुठे तरी बदलाचा भाव जाणवत आहे. देशात सध्या जे सुरु आहे ते पाहता हे लाेकशाहीचे वातावरण नाही असे वाटते असे मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे- केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाई राजकीय हेतूने हाेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामागे कुठेनाकुठे तरी बदलाचा भाव जाणवत आहे. देशात सध्या जे सुरु आहे ते पाहता हे लाेकशाहीचे वातावरण नाही असे वाटते असे मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. There is need to thinking about democracy in india or not says environment minister Aditya Thakare

    पर्यायी इंधन परीषदेच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना भाजप साेबत निवडणुक निकाला नंतर न गेल्याने कारवाईचे परिणाम भाेगावे लागत असल्याचे म्हटले हाेते यावर आदित्य ठाकरे म्हणाले, अशा जर धमक्या यायला लागल्या तर देशात लाेकशाही आहे का हे पाहणे महत्वपूर्ण ठरेल.



    परवा काेणतरी एका पक्षाने जाहीर सभेत सांगितले की, तुम्ही ठराविक पक्षाला मतदान केले नाही तर तुमच्या मागे चाैकशी लागेल. जनतेला धमक्या काेणी देत असेल तर लाेकशाही राहिली आहे का याचा विचार सर्वांना करावा लागेल. न्यायप्रक्रिया व लाेकशाही देशात आहे की नाही, कारण काेणीतरी कारवाईबाबत संकेत देते आणि त्याप्रकारे यंत्रणा काम करताना दिसत आहे

    याच्यावर विचार झाला पाहिजे.राजकीय मंडळी, सरकारवर टिकाटिप्पणी करणे ठीक आहे परंतु सरकारसह इतरानांही धमक्या येणे व कारवाई हाेणे याेग्य नाही. देश काेणत्या दिशेने जात आहे याबाबत विचार करणे महत्वपूर्ण बनले आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्ष एकजूट असून त्याची ताकद तुम्हाला दिसून येत आहे.

    पुढे ते म्हणाले, देशात नवीन तंत्रज्ञान बदल हाेत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्व क्षेत्रात करता आला पाहिजे. ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन वाढविण्यावरही भर दिला जात अाहे. सध्या पेट्राेल, डिझेलचे दिवसेंदिवस वाढते दर पाहता पर्यायी इंधनाचा वापर करणे महत्वपूर्ण आहे. भविष्यात पर्यावरणपूरक इंधन दुचाकी-चारचाकी वाहनात वापरणे आवश्यक आहे.

    There is need to thinking about democracy in india or not says environment minister Aditya Thakare

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा