महाराष्ट्राच्या राजकारणाच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या नावाखाली बऱ्याच काही गोष्टी सुरू आहेत, त्यापैकी म्याव करणे, शाई फेकणे आणि चप्पल फेकणे याला फार म्हणजे फारच महत्त्व आले आहे.There is a lot going on in the name of Maharashtra’s political culture
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून म्याव म्याव केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. विविध कारणांनी नारायण राणे, नितेश राणे यांच्या मागे महाराष्ट्र पोलीसांचा ससेमिरा लागलाच आहे. दिशा सालियन प्रकरणात राणे पिता पुत्रांना मालवणी पोलीस स्टेशनमध्ये 9 तास बसवून ठेवण्यात आले. शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आल्यानंतर त्यांना सोडून “देण्यात आले.
त्या आधी अमरावती महापालिका आयुक्तांवर शाई फेक प्रकरणात आमदार रवी राणांविरोधात 307 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या वादातून हा प्रकार घडला. मात्र, त्यावेळी आमदार रवी राणा दिल्लीत होते. आता रवी राणांनी भर विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप करत पोलीसांनी खासदार नवनीत राणांचा पोलीसांनी अपमान केल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही, आपल्या वृद्ध आई वडिलांनाही त्रास झाल्याचा दाखला त्यांनी दिला आहे.
यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी आमदार रवी राणा हे दिल्लीत असताना 307 कलमानुसार गुन्हा कसा दाखल झाला?, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ आधी गुन्हा दाखल झाला आहे आणि नंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत… हा घटनाक्रम स्पष्ट आणि बोलका आहे.
7 मार्च 2022 ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर पिंपरीतील शाहूनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चप्पल फेक केली. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी २४ तासांसाठी पोलीसांना सुट्टी द्या. मग बघा भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कुठे कुठे चपला घालतील, असा इशारा दिला आहे.
शाई फेकल्या प्रकरणात 307 कलमानुसार तिथे प्रत्यक्ष हजर नसलेल्या आमदारावर गुन्हा दाखल होतो, तर चप्पल फेकणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करतात हे पाहायचे आहे, असे खोचक उद्गार आमदार आशिश शेलारांनी काढले आहेत.
चप्पल फेकीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कान आमदार रोहित पवारांनी टोचल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण प्रत्यक्षात रोहित पवारांनी कार्यकर्त्यांनी चपला फेकू नयेत. विरोध करायचा असेल तर संविधानिक मार्ग आहेत. चप्पल फेकीसारख्या घटना करू नयेत, अशी विनंती कार्यकर्त्यांना केली आहे.
म्हणजे अद्याप चप्पल फेकीवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. रोहित पवारांनी स्पष्टपणे त्या घटनेचा निषेधही केलेला नाही. त्यांनी चप्पल फेकू नये, अशी कार्यकर्त्यांना विनंती केली आहे… मात्र, रोहित पवारांच्या विनंतीला मराठी माध्यमांनी कान टोचल्याची उपमा देऊन घेतली आहे… यातच सगळे आले…!!