Friday, 2 May 2025
  • Download App
    ‘’... तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!Then Narayan Rane would not have left the ShivSena Raj Thackeray told the incident that happened in front of Balasaheb

    ‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!

    Raj Thakrey and Rane

    ”ज्याप्रकारचं राजकारण सुरू होतं, त्याचा शेवट हा…” असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर आजोयित जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. याशिवाय नारायण राणे हेदेखील शिवसेना सोडून गेले नसते, मात्र तेव्हा नेमकं काय घडलं, ज्यामुळे नारायण राणे गेले ते राज ठाकरेंनी सांगितलं.  Then Narayan Rane would not have left the ShivSena Raj Thackeray told the incident that happened in front of Balasaheb

    मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!

    राज ठाकरे म्हणाले, ‘’मी तुम्हाला नारायण राणेंचा प्रसंग सांगतो, नारायण राणे बाहेर गेलेच नसते. नारायण राणेंचं सगळं ठरल्यानंतर मी नारायण राणेंना फोन केला, म्हणालो नारायण राव काय करताय, म्हटलं मी साहेबांशी बोलतो जाऊ नका. मला म्हणाले बोला तुम्ही साहेबांशी. मी बाळासाहेबांना फोन लावला. मी त्यांना सांगितलं, त्यांची इच्छा नाही पण… जाऊ देऊ नका. मला म्हणाले लगेच तुम्ही घेऊन ये घरी, मी म्हणालो नक्की ना, तर म्हणाले नक्की घेऊन ये घरी, त्यानंतर फोन ठेवला. मी नारायणरावांना फोन केला म्हटलं आताच्या आता इकडे या आपल्याला साहेबांकडे जायचं आहे. ते मला म्हणाले निघालोच. ते तिथून निघाले मला परत पाच मिनिटांत बाळासाहेबांचा फोन आला, मला म्हणाले त्यांना नको बोलावूस. मला कोणीतरी मागे बोलतोय असं ऐकू येत होतं. मला म्हणाले की त्यांना नको बोलावूस. मला फोन करून त्यांना सांगावं लागलं की येऊ नका.’’

    मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!

    याशिवाय ‘’ज्याप्रकारे ही संघटना सुरू होती, पक्ष सुरू होता. लोकांना बाहेर काढणं जे सुरू होतं. ज्याप्रकारचं राजकारण सुरू होतं, त्याचा शेवट हा. मला त्यांचं काय झालं त्याच्याशी काही फरकत पडत नाही. त्याचं राजकारण त्यांना लखलाभो. पण जे नाव  लहानपणापासून मी पाहत आलो, ते जेव्हा टांगताना दिसायला लागलं मला, आज यांच्याकडे की त्यांच्याकडे. तेव्हा त्रास व्हायला लागला.’’ असंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

    Then Narayan Rane would not have left the ShivSena Raj Thackeray told the incident that happened in front of Balasaheb

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??