• Download App
    महाराष्ट्रात आता मास्कचा वापर ऐच्छिक|The use of masks is now optional in Maharashtra

    महाराष्ट्रात आता मास्कचा वापर ऐच्छिक

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना महासाथीमुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंधात वावरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळेल. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेतले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज जाहीर केले. मास्कचा वापर आता ऐच्छिक असणार आहे. The use of masks is now optional in Maharashtra

    गुढी पाडवा, आंबेडकर जयंती मिरवणुकांना

    परवानगी देण्यात आली आहे. रमजान ईद देखील कोविडपूर्व काळानुसार साजरी केली जाऊ शकेल. आज राज्य मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयाऐवजी सहयाद्री अतिथीगृह येथे पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. येत्या एक एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील करण्यात येतील.



    मास्क वापरणे आता ऐच्छिक असेल. राज्यातील कोविड व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    The use of masks is now optional in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य