• Download App
    रग्णालयामधील ऑक्सिजन संपल्यामुळे चौघांचा दुर्दैवी मृत्यू ; धक्कादायक घटना।The unfortunate death of four due to lack of oxygen in the hospital; Shocking incident

    रूग्णालयांमधील ऑक्सिजन संपल्यामुळे पुणे जिल्ह्यातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक घटना

    वृत्तसंस्था

    पुणे : ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चौघांचा मृत्यू झाला आहे. चाकणमधील तीन जणांचा, तर पुण्यातील शेवाळवाडीतील एकाचा मृत्यू झाला. The unfortunate death of four due to lack of oxygen in the hospital; Shocking incident
    चाकणमधील खासगी रुग्णालयात मंगळवारी पहाटे ऑक्सिजन संपल्याने २० गंभीर रुग्णांना तातडीने अन्यत्र हलवले. २५ वर्षीय युवकासह ४५ वर्षीय पुरुष आणि ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू मात्र झाला.



    ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने मध्यरात्री रुग्णालय प्रशासनाने २० रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना हलवण्याच्या सूचना केल्या. काही रुग्णांन हलवले. मात्र अन्य रुग्णांच्या नातेवाईकांना कुठेही व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही.अखेर यातील तीन रुग्णांनी ऑक्सिजनअभावी प्राण सोडले. चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी ही माहिती दिली. ३ मृतदेहांवर चाकणच्या गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार केले आहेत.

    हडपसरमध्येही एक रुग्ण दगावला

    हडपसरजवळील शेवाळेवाडी येथील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्याने एकाचा मृत्यू झाला. रुग्णालयात ५३ बेड असून, ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील ऑक्सिजनही संपला होता.

    The unfortunate death of four due to lack of oxygen in the hospital; Shocking incident

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!