• Download App
    पायी वारीची परंपरा सलग दुसऱ्या वर्षीही खंडित; मानाच्या दहा पालख्या एसटी बसमधून जाणार The tradition of Pai Wari was broken for the second year in a row; Ten palanquins will go by ST bus

    पायी वारीची परंपरा सलग दुसऱ्या वर्षीही खंडित; मानाच्या दहा पालख्या एसटी बसमधून जाणार

    वृत्तसंस्था

    पुणे : आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या उत्साहात होणारी पायी वारीची परंपरा कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षीही खंडित झाली आहे. यंदा मानाच्या केवळ दहाच पालख्या एसटी महामंडळाच्या बसमधून पंढरीकडे रवाना होणार आहेत. पालख्यांच्या बस प्रवासाची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. The tradition of Pai Wari was broken for the second year in a row; Ten palanquins will go by ST bus

    गेल्या वर्षी कोरोनामुळे पायी वारीऐवजी एसटी बसचा वापर केला होता. यंदाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानाच्या दहा पालख्यांचा प्रवास एसटीतून करण्याचे आदेश दिले आहेत. 19 जुलै रोजी या बस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांनाना विनामूल्य बस देण्यात येणार आहेत.

    वाखरीपासून चालत प्रवास…

    या मानाच्या दहा पालख्यांचा त्यांच्या मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसेस प्रवासादरम्यान वारकऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळ उपलब्ध करून देण्यात येईल, असेही परिवहनमंत्री अॅड. परब यांनी सांगितले.

    The tradition of Pai Wari was broken for the second year in a row; Ten palanquins will go by ST bus

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ