• Download App
    Vidarbha after Nashik. ठाकरे बंधू बसले अजूनही घरी; एकनाथ शिंदे यांची मात्र नाशिक पाठोपाठ विदर्भात मुशाफिरी!!

    ठाकरे बंधू बसले अजूनही घरी; एकनाथ शिंदे यांची मात्र नाशिक पाठोपाठ विदर्भात मुशाफिरी!!

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : महापालिकांच्या निवडणुका मध्यावर आले असताना ठाकरे बंधू बसले अजूनही घरी पण एकनाथ शिंदे यांची मात्र नाशिक पाठोपाठ विदर्भात मुशाफिरी!!, असेच राजकीय चित्र आज समोर आले. Vidarbha after Nashik.

    महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंनी युती केली त्यांनी वेगवेगळ्या शिवसेना आणि मनसे शाखांना भेटी दिल्या तरी अजून दोन्ही बंधूंची एकत्रित सभा कुठे झाली नाही तेव्हा ते मुंबई आणि ठाण्याबाहेर सुद्धा गेले नाहीत. त्याउलट एकनाथ शिंदे यांनी नाशिकचा दौरा केला. भाजपमध्ये गेलेले नेते सुद्धा त्यांनी शिवसेनेत आणले. त्या पाठोपाठ ते आज अमरावतीला सुद्धा पोहोचले. अमरावती त्यांनी जोरदार भाषण केले.

    शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज अमरावतीमध्ये जाहीर सभेत शिवसेना पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकताना केले.



    मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. महिला भगिनींसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा तुमच्या भावाचा शब्द आहे, असेही यावेळी निक्षून सांगितले.

    अमरावती शहरात पाणीटंचाई, खराब रस्ते, कचरा व्यवस्थापन, लटकलेल्या वीजतारा, स्ट्रीट लाईट, गटार व्यवस्था, उद्याने, मैदाने, स्टेडियम, रुग्णालये असे मूलभूत प्रश्न आजही कायम आहेत. नगरविकास विभागाचे मंत्री म्हणून कचरा प्रश्नावर मार्ग काढणारच, अंडरग्राउंड वीजवाहिन्यांचे जाळे उभारणार, तसेच पिण्याचे शुद्ध पाणी आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

    अमरावती महापालिकेला उद्यान विकासाकरिता १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भविष्यात आणखी तरतूद केली जाईल. रस्ते आणि पाणीपुरवठा योजनांसाठी नगरविकास विभागामार्फत निधी मंजूर झाला असून लवकरच तो उपलब्ध करून देऊ असेही याप्रसंगी स्पष्ट केले.

    अमरावतीचा कायापालट करायचा असेल, विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. अमरावतीच्या भविष्याचा फैसला करणे आपल्या हातात असून येत्या १५ तारखेला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अमरावतीकर नागरिकांना केले.

    याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता, जलसंधारण मंत्री संजय राठोड, ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार संजय रायमुलकर, प्रियांका विश्वकर्मा, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने अमरावतीकर नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

    The Thackeray brothers are still sitting at home; Eknath Shinde, however, is touring in Vidarbha after Nashik.

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मी बोलायचे ठरविले तर…; फडणवीसांचा अजितदादांना पुन्हा इशारा; महेश लांडगेंना बूस्टर डोस!!

    शिंदे, आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने प्रचारात; पण ठाकरे, पवारांची पुढची पिढी सुद्धा बसली घरात!!

    Ambernath : अंबरनाथमधील काॅंग्रेसच्या बारा नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश